loader image
[ays_poll id=7]

आज औरंगाबाद मध्ये काय होणार राज गर्जना ? राज ठाकरे आणि भाजपचे टार्गेट एकच शिवसेना

May 1, 2022

मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसा पठण ह्या मुद्द्यावरून राज्यातले राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना आज रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये, तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत सभा होत आहे. या दोन्ही सभांमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अर्थात शिवसेनेला लक्ष्य केले जाण्याची दाट शक्यता आहे.

मनसेने राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेसाठी जोरदार वातावरण निर्मिती केली आहे. ठाण्यातील उत्तर सभेनंतर राज औरंगाबादला काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण ३ मेनंतर म्हणजे रमजान ईद झाल्यावर मशिदींवरील भोंगे उतरविले नाहीत, तर मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांच्या इशार्‍याची मुदत दोन दिवसांत संपणार आहे. त्यामुळे राज आजच्या सभेत आणखी कोणता नवा आदेश मनसैनिकांना देतात याची उत्सुकता आहे.
तर मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून भाजपने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र चिंतन, महाराष्ट्र वंदन या कार्यक्रमाचे रविवारी सायनच्या सोमय्या मैदानात आयोजन केले आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या माध्यमातून मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावर बोट ठेवून शिवसेनेवर हल्लाबोल करण्याची तयारी भाजपने केली आहे. याच सभेत भाजप मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकून शिवसेनेला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार करण्याचीही शक्यता आहे.

अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.