loader image
[ays_poll id=7]

आमच्या सर्व वाचकांना, हितचिंतकांना,जाहिरातदाराना अक्षय तृतीया, भगवान परशुराम जयंती तसेच ईद ए मिलाद च्या शुभेच्छा

May 3, 2022


वैशाख शुध्द तृतीयेला “अक्षय तृतीया “ म्हणतात. याला वसंतोत्सवाचा दिवस असेही म्हणतात. हा चार मुहूर्त पैकी अर्धा मुहूर्त समजला जातो.हा श्राद्ध दिवस मानला जातो.हा दिवस पितरांचा सण आहे. वास्तुशांती करता पण मुहूर्त या दिवशी असतो.
बुधवार आणि रोहिणी नक्षत्र ज्या अक्षय तृतीयेला येईल ती सर्वात महत्वाची चांगली महापूण्य कारक मानली जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू करण्यास मुहूर्त पाहण्याची गरज नाही.या दिवशी केलेले दान,हवन,तर्पण,पूजा,जप इ पुण्यकर्म अक्षय्य टिकते.म्हणून” अक्षयतृतीया” ही पुण्य तिथी आहे. थोडक्यात पितरांचे ऋण फेडण्याचा हा दिवस.तसेच हा दिवस ” परशुराम जयंती” म्हणूनही ओळखला जातो.
** अक्षय तृतीया हे नाव कसे पडले **
१. या दिवशी जप,होम,पितृ तर्पण,दान पूजा वैगरे पुण्य कर्म केल्याने ते अक्षय्य पुण्य दायक होते.म्हणून या दिवसाला अक्षय्य तृतीया नाव पडले
२. श्री कृष्ण हा पांडवांचा सखा तसाच पाठीराखा आणि त्यांचा मार्गदर्शक पण होता.पांडव कोणत्याही अडचणीत,संकटात सापडोत,श्रीकृष्ण सखा त्यांच्या रक्षणासाठी तिथे लगेच हजर व्हायचा.त्यांना संकटातून सुटण्यासाठी सल्ला द्यायचा. ते सुखात असोत किंवा दुःखात त्यांना कृष्णाची आठवण व्हायची. लढाई अगर दानधर्म ची बाब असो भगवान श्री कृष्ण त्यांना योग्य ते उपदेश करायचे.
एकदा पांडव गंगेवर स्नानाला गेले. श्री कृष्ण ही होतेच. पांडव रथ सोडून गंगेच्या काठी आले. तिथे सुंदर मंदिरात जाऊन बसले.सहज बोलणी निघाली. धर्मराज फार धार्मिक त्याला नेहमी दानधर्म करावासा वाटायचा यावेळी त्याच्या मनात आले माणसाने केलेले पुण्य कायम कसे टिकेल? त्याने लगेच कृष्णाला विचारले कृष्णाने सांगितले ” वैशाख शुद्ध तृतीयेला दान करावे,या दिवशी होम हवन करावे,यज्ञात आहुती द्यावी,देवाचे नावाने दान धर्म करावा.आपल्या परलोकातील पितर करिता वाड वडील करिता त्यांच्या नावाने पुण्य कर्म,तर्पण,दान करावे अशा प्रकारे केलेले कर्म कायम टिकते ” धर्म राजाला हे ऐकून फार आनंद झाला त्याला हवी असलेली चांगली गोष्ट समजली म्हणून या तिथीला अक्षय तृतीया नाव पडले.

  • या दिवसाला येवढे महत्व का आले *
    १ चार युगे आहेत – कृत,त्रेता,द्वापार आणि कली
    यातील पहिले जे कृतयुग यात लोक फार सुखी होते सर्वत्र शांतता,समाधान नांदत होते.अशा कृत युगाचा आरंभ या दिवशी वैशाख शू.तृतीयेला झाला.कोणत्याही युगाचा आरंभ शुभ मंगल मानला जातो म्हणून हा दिवस महत्वाचा आहे.
    २. तापलेल्यानां थंड करावे,भुकेले,तहानलेल्याना तृप्त करावे असा प्रघात आहे. या दिवशी जलकुंभदान करतात. पितर यांना उदक कुंभ दान करतात या दिवशी श्राद्ध करतात म्हणजेच परलोकात गेलेल्या वाड वडिलांना पाणी देतात
    ३. हा दिवस आणखी एका कारणासाठी लक्षात ठेवण्यासारखा आहे या दिवशी परशुराम जन्म झाला उन्मत्त झालेल्या क्षत्रिय यांना या ब्रह्मनाने धडा शिकवला सर्व पृथ्वी जिंकली पण आपल्या ब्रहमनपणाला विसरला नाही.त्याने पृथ्वी जिंकली आणि सारी दान करून टाकली आणि तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला.
    **** पूजा ****
    हा दिवस पितरांचा सण म्हणून या दिवशी.दुपारी १२ वाजे नंतर पित्राना नैवद्य द्यावा.या दिवशी पितरांना उदक कुंभ दान करतात म्हणजे पत्रावळी वेष्टन करावे.त्या घटाला गंध लावावे व फुल तीळ सुपारी विड्याची पाने दक्षिणा पाणी घालने घटाची पंचोपचार पूजा करून तो ब्राह्मनाला दान द्यावा. घरातील सर्वांनी दक्षिण कडे तोंड करून पितृ स्तोत्र हात जोडून म्हणावे. तसेच केळीचे पूजन करावे.
    *** शेती साठी ***
    दुपारी १२ वाजेला शेताचे मध्य भागी खड्डा करून १ व्यक्ती जेवेल एवढे अन्नच नेवेद्य ताट करून त्या खड्ड्यात ठेवावे व सीता मातेला नेवेद्य दाखवून प्रार्थना करावी…..

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.