loader image
[ays_poll id=7]

अक्षय तृतीया आणि रमझान ईद च्या दिवशी ग्रेट गुरू – शिष्य भेट

May 3, 2022



ज्यांनी असंख्य चित्रकलेचे हात घडवले, ज्यांनी मला चित्रकलेतील बाराखडी शिकवली, ज्यांनी जीवनाच्या अनेक काटेरी वाटांमधुन चित्र व रंगाची शितल वाट माझ्यासाठी निवडून त्या वाटेवर मला यशस्वी रित्या चालण्याची संधी, हिम्मत उपलब्ध करून दिली.
ज्यांनी रंग अलगद हाताळायला शिकवले, रंगातील ओलावा,रंगातील प्रवाह, रंगातील मृदुता,रंगातील भावना,रंगातील प्रतिकात्मक अर्थ ,व त्यांचा योग्य उपयोग शिकवला. रंग आभाळा सारखे असतात, रंगांना जात,पात,धर्म नसतो, हिंदूंच्या गालावरील भगवा रंग,व मुसलमानांच्या गालावरील हिरवा रंग जेंव्हा पांढऱ्या रंगाच्या रुमालाने पुसला तर तो भारताच्या झेंड्याचा रंग होतो. सर्व धर्म त्या त्या जागी श्रेष्ठ आहेत परंतु आपला प्रथम धर्म मानवता धर्म. ही चित्रकलेची शिकवण व हे रंगांचे सुंदर अर्थ ज्यांच्या मार्गदर्शनाने मी शिकलो ,घडलो , ते माझे गुरु मा.श्री.सुभानखां चांदखां पठाण सर.( मालेगाव )
आज अक्षय तृतीया व ईद निमित्ताने सरांना त्यांच्या रहात्या घरी मालेगाव येथे भेट घेण्याचा योग आला. सरांनां खूप दिवसानंतर ईद मुबारक ईद च्या शुभेच्छा देण्याचा सुवर्णं योग आज आला. सरांची तब्येतीची जवळून विचारपूस करता आली, खुप गप्पा झाल्या.
सरांनी मी केलेले फलक रेखाटन मोबाईलवर बघितले, आत्ता कुठे सरांनी मला खूप छान कार्य केलेस अशी बहुमोलाची पावती दिली. नाहीतर मी विद्यार्थी दशेत असतांना प्रत्येक काढलेल्या माझ्या चित्राला ‘ ठीक आहे’ अजुन यात असे हवे होते, तसे हवे होते. असा शेरा द्यायचे.
सरांनी मी विद्यार्थी असतांना माझ्या चित्रांना ,,,खूप छान, सुंदर,उत्तम असा शेरा त्या वेळेस का दिला नाही हे मला 30 वर्षा नंतर आज कळाले.
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेत कलाशिक्षक म्हणून सेवा निवृत्त झालेले सर आज वयाच्या 82 वर्षीही हसत मुख पाहून उर भरून आले. त्यांचा लहान मुलगा कलाशिक्षक श्री.बबलू पठाण व कुटुंब सरांची उतरत्या वयात खूप काळजी घेत आहेत हे बघून समाधान वाटलं. सरांचे उर्वरित आयुष्य नक्कीच सुखाचे जाईल यात शंका नाही.
गुरूंचे शुभ हात जेंव्हा भरभरून आशीर्वाद देतात,कौतुक करतात तेंव्हा नवीन ऊर्जा निर्माण होते.
चित्रकलेतील आजवर केलेले सर्व कार्य या गुरु चरणी अर्पण.

  • देव हिरे. ( कलाशिक्षक )

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.