Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

संजय गांधी निराधार योजना समितीची पहिली बैठक संपन्न; ८६५ अर्जांना मंजुरी

May 5, 2022

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या सूचनेनुसार गुरुवार दिनांक ४ मे रोजी संजय गांधी निराधार योजना समितीची पहिली बैठक समितीचे अध्यक्ष व शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय नांदगाव येथे संपन्न झाली.
नायब तहसीलदार नरेंद्र वाघ यांनी प्रास्ताविक करत अध्यक्ष व सदस्यांचे स्वागत केले. बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांकडून सदस्यांना सर्व योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
संपूर्ण तालुक्यातून आलेल्या 900 अर्जांवर चर्चा करण्यात येवून यातील जवळपास ८६५ अर्ज मंजूर करण्यात आले असून ३५ अर्जांची कागदपत्र अपूर्ण असल्यामुळे संबंधित अर्जदारांना संपर्क करून आवश्यक ते कागदपत्र जोडून नव्याने अर्ज दाखल करून घेण्याच्या सूचना अध्यक्ष किरण देवरे यांनी केल्या. मागील १० ते १२ वर्षांपासून निराधार योजना समिती स्थापन नसल्यामुळे अनेक निराधार गरजू लाभार्थी या योजनांचा लाभ मिळण्यापासून वंचित राहिलेले होते.
तालुक्यातील निराधार महिला तसेच गरजू लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालयात संपर्क साधावा योजनांचा लाभ मिळवून दिल जाईल, असे आवाहन आमदार सुहास अण्णा कांदे तसेच समितीचे अध्यक्ष किरण देवरे यांनी केले आहे.
याप्रसंगी समिती चे सदस्य विजय ईप्पर, ताराबाई सोनवणे, प्रवीण निकम, प्रभाकर पवार, राजेंद्र पवार, विजय पाटील,संगीता पवार आशुतोष जाधव, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, नायब तहसीलदार नरेंद्र वाघ, अव्वल कारकून संतोष डुंबरे, बी.ए.पैठणकर, श्रीमती रत्नप्रभा पवार, प्रवीण चव्हाण आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियाने घेतली नोंद -नांदगावच्या योग शिक्षकाची बर्फाच्या लादीवर ५१ योगासने आणि २१ सूर्यनमस्कार

बघा व्हिडिओ : वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियाने घेतली नोंद -नांदगावच्या योग शिक्षकाची बर्फाच्या लादीवर ५१ योगासने आणि २१ सूर्यनमस्कार

नांदगाव - मारुती जगधने येथील योग प्रशिक्षक बाळू मोकळ यांनी चक्क बर्फाच्या थंड लादीवर ५१ योगासने व...

read more
मनमाड महाविद्यालयात विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी स्कूल कनेक्ट (NEP -2020 Connect) कार्यशाळा संपन्न

मनमाड महाविद्यालयात विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी स्कूल कनेक्ट (NEP -2020 Connect) कार्यशाळा संपन्न

  मनमाड - आधुनिक काळा बरोबर शिक्षण व्यवस्था ही बदलली पाहिजे कौशल्यपूर्ण शिक्षण आणि उत्तम...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]