Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राजर्षी शाहू महाराजांना स्मृतिशताब्दी निमित्त अभिवादन !

May 6, 2022

प्रस्थापित सामाजव्यस्थेला छेद देऊन समतेचा पुरस्कार करणारे, लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी निमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा व ऑल इंडिया ओ.बी.सी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने वर्कशॉप मधील टाईमबुथ जवळ अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे,ओ.बी.सी.रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे अध्यक्ष रतन निकम, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे विजय भाऊ गेडाम, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड,ओ.बी.सी.एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे कोषाध्यक्ष रामधनी यादव, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर
आदी उपस्थित होते.
ज्या प्रमाणे युरोपातील त्या वेळी कामगारांना वाटत होते की जगातील कामगारांनी एक झाले पाहिजे त्या प्रमाणे राजर्षी शाहू महाराजांना वाटत होते की देशातील कामगारांनी एक झाले पाहिजे.त्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी १९१७ मध्ये कामगारांसाठी संमेलने आयोजित केले.होते.आताच्या मान्यता प्राप्त कामगार संघटनाचा उगम हा १९२५ते ३० दरम्यान आहे. पण राजर्षी शाहू महाराजांनी कामगार साठी आपले कार्य हे त्या आधी सुरू केले होते. आपल्या संस्थानात राजर्षी शाहू महाराज
कामगार हिताचे कार्य केले आहे असे मत झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.
रतन निकम, पंढरीनाथ पठारे आदी चे भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद झोंबाड यांनी केले तर आभारप्रदर्शन ओ.बी.सी.रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे सचिव शशिकांत अढोकार यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष संजय काकडे, दिलिप बोरसे, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सुभाष जगताप, कारखाना शाखा चे सहाय्यक सचिव सुनील सोनवणे, कारखाना शाखा चे कार्यालय सचिव संदीप पगारे, कारखाना शाखा चे माजी अतिरिक्त सचिव किरण आहीरे, कारखाना शाखा चे सहाय्यक संघटक सचिव हर्षद सुर्यवंशी, वरूण म्हसदे, संदिप अहिरे, अभ्युदय बागुल, प्रशांत मोरे, विनोद खरे, गौतम एळिंजे, गणपत गायकवाड, रविंद्र पगारे, विनोद झोडपे, किरण वाघ, अर्जुन बागुल, कल्याण धिवर, प्रभाकर निकम, फकिरा सोनवणे, विशाल त्रिभुवन,दिपक अस्वले,दिपक राऊत आदिंनी केले.

अजून बातम्या वाचा..

शिक्षणाला जोड मेहनतीची – मनमाड च्या सुशील पवारने अमेरिकेत शिष्यवृत्तीच्या जोरावर शिक्षण घेत मिळविला बेस्ट  आऊट स्टँडींग अवॉर्ड

शिक्षणाला जोड मेहनतीची – मनमाड च्या सुशील पवारने अमेरिकेत शिष्यवृत्तीच्या जोरावर शिक्षण घेत मिळविला बेस्ट आऊट स्टँडींग अवॉर्ड

अनेकांनी स्वप्न पाहिलेले असते की परदेशात जाऊन शिक्षण घ्यावं मात्र हे स्वप्न सत्यात उतरवणे...

read more
दिड वर्षाच्या बाळाला मण्यार जातीच्या सापाचा चावा – डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने वाचले चिमुकल्याचे प्राण

दिड वर्षाच्या बाळाला मण्यार जातीच्या सापाचा चावा – डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने वाचले चिमुकल्याचे प्राण

दीड वर्षाचे बाळ आपल्या आईच्या कुशीत शांत झोपला असताना रात्रीच्या अंधारात सळसळणारा मण्यार जातीचा...

read more
मनमाड जळगाव स्थानकादरम्यान १४,१५ ऑगस्ट रोजी मेगब्लॉक – अनेक गाड्या रद्द तर काहींच्या मार्गात बदल

मनमाड जळगाव स्थानकादरम्यान १४,१५ ऑगस्ट रोजी मेगब्लॉक – अनेक गाड्या रद्द तर काहींच्या मार्गात बदल

मनमाड-जळगाव स्थानकादरम्यान मेगाब्लॉकमुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून या काळात प्रवाशांना...

read more
नवक्रांतीची ज्योत तेवत ठेवा ,क्रांती दिनी निर्धार नवक्रांती युवक सघांचा ५ वा वर्धापन दिन उत्सवात साजरा

नवक्रांतीची ज्योत तेवत ठेवा ,क्रांती दिनी निर्धार नवक्रांती युवक सघांचा ५ वा वर्धापन दिन उत्सवात साजरा

नांदगाव प्रतिनिधी देशावर,राज्यावर बोलण्यापेक्षा गावावर बोला आणि क्रांतीदिन साजरा करतांना ज्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]