loader image
[ays_poll id=7]

मांगीतुंगी येथील भगवान ऋषभदेव महमस्ताभिषेक महोत्सव: प्रशासनाने जय्यत तयारी करण्याचे ना.भुजबळांचे निर्देश

May 9, 2022

मांगीतुंगी येथे भगवान ऋषभदेव 108 फुट मूर्ती महामस्तकाभिषेक महोत्सव १५ जून ते ३०जून २०२२ या कालावधीत होणार आहे. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांनी समन्वयाने व जलदगतीने आवश्यक ती सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मांगीतुंगी येथील भगवान ऋषभदेव मूर्ती निर्माण कमिटी कार्यालयात आयोजित बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते.यावेळी आमदार दिलीप बोरसे, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, प्रांताधिकारी बबन काकडे , बागलाण तहसिलदार जितेंद्र इंगळे, गटविकास अधिकारी पांडूरंग कोल्हे, महावितरणचे अभियंता अनिल बोंडे, माजी आमदार दिपिका चव्हाण, संजय चव्हाण, भिलवडचे सरपंच गुलाबबाई गावित, १०८ फुट भगवान ऋषभदेव मूर्ती निर्माण कमिटी पीठाधीश रवींद्रकिर्ती स्वामीजी, महामंत्री संजय पापडीवाल, अधिष्ठता सी.आर.पाटील, कोषाध्यक्ष प्रमोद कासलीवाल, कार्याध्यक्ष अनिल जैन, भूषण कासलीवाल, जीवनप्रकाश जैन, सुमेरकुमार
काले,ॲड.रवींद्र पगार, महेंद्र काले आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, या महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी स्थानिक व बाहेरील शहरांतून भाविक मोठ्या संख्येने येणार आहेत. यासाठी महामार्गावरील दिशादर्शक फलकांची दुरूस्ती करणे व आवश्यक ठिकाणी नवीन दिशादर्शक फलक त्वरीत लावण्यात यावेत. त्याचप्रमाणे महोत्सव काळात डोंगरावर मूर्तीच्या ठिकाणी पोहचण्यासाठी असेलेल्या उदवाहक यंत्रणा सतत्याने सुरू राहण्यासाठी, त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी येणाऱ्या भाविकांसाठी स्ट्रीट लाईटसची व्यवस्था करणे याकरीता वीज मुबलक प्रमाणात उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी महावितरणचे अधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी योग्य समन्वय साधून या गोष्टी प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी दिल्या आहेत.
ते पुढे म्हणाले की, या महोत्सव काळात डोंगरावरील मूर्तीच्या ठिकाणी हरणबारी धरणातून पाणी उचलण्यासाठी पाण्याच्या पाईपलाईनची वेळेत दुरूस्ती व जोडणी कायमस्वरूपी करण्यात यावी. याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना केल्यास यात्रा कालावधी संपल्यानंतर सुद्धा स्थानिक गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. यादृष्टीने कार्योत्तर मंजूरीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबधित यंत्रणेला दिल्या आहेत. यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणांनी सतर्क राहून यात्रेच्या ठिकाणी चोख बंदोबस्ताची व्यवस्था करावी. यासाठी वेळ पडल्यास वाढीव मनुष्यबळ व होमगार्डस यांचीसुद्धा सेवा घेण्यात यावी, असेही यावेळी पालकमंत्री यांनी सांगितले.
यात्रा काळात आरोग्य यंत्रणांनी रूग्णवाहिका, डॉक्टर्स, परिचारीका, औषधे यांची सुसज्ज व्यवस्था ठेवणे आवश्यक आहे. तसेच जिल्हा परिषद व महानगरपालिका यांनी समन्वयाने या ठिकाणी यात्रा काळात स्वच्छतेच्या दृष्टीने जंतुनाशक औषधे फवारणी, फिरते शौचालय आदी व्यवस्था करावयाची आहे. पुढील बैठकीपूर्वी सर्व यंत्रणांनी वेळेतच कामे पूर्ण करावीत अन्यथा जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असे निर्देशही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.