loader image
[ays_poll id=7]

पवार, सोमासे यांची निवड

May 11, 2022


नांदगाव तालुक्यातील नागापूर येथे सरपंच ताराबाई दगु पवार ,राजेंद्र वाल्मिक पवार ,रघुनाथ सोमासे, सुधाकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जय नागेश्वर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी विशाल राजेंद्र पवार तर व्हा . चेअरमनपदी भिमराज गंगाधर पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे .तसेच नागापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रल्हाद पुंजा पवार , व्हा . चेअरमनपदी रंजना भास्कर सोमासे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याने दोन्ही सहकारी संस्थांवर मनमाड बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र वाल्मिक पवार यांचे वर्चस्व असल्याचे सिध्द झाले आहे . नागेश्वर वि . का . सोसायटीच्या सर्व 13 जागांवर बिनविरोध निवड करण्यात आली . त्यानंतर चेअरमनपदी विशाल पवार व व्हा . चेअरमनपदी भिमराज पवार यांची निवड बिनविरोध झाल्याने फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे निवडीचे स्वागत करण्यात आले .तसेच नागापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चेअमरनपदी प्रल्हाद पवार , व्हा . चेअरमनपदी रंजना सोमासे यांची निवड करण्यात आली असून या संस्थेवर राजेंद्र वाल्मिक पवार यांच्या गटाला नऊ जागांवर विजय संपादन करता आला . त्यामुळे या दोन्ही संस्थावर त्यांचे वर्चस्व सिध्द झाले आहे . यावेळी जय नागेश्वर संस्थेचे नवनिर्वाचित संचालक सखाहरी कदम ,माधव पवार , बाळासाहेब पवार , अनुसयाबाई पवार , बाळासाहेब सोमासे , संजय पवार , विनित पवार , उज्वला पवार , स्नेहल पवार , उमेशचंद्र पाटील , रमेश जाधव , उपस्थित होते तर नागापूर वा.का.सेवा सोसायटीच्या निवडीप्रसंगी नागू मोरे , संतोष पवार , नागू पवार , गोविंद सोमासे , विजय बोडखे , कल्पना पवार , संतोष शिलावट हे संचालक मंडळ उपस्थित होते . नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
.