loader image
[ays_poll id=7]

राज्यस्तरावर आघाडी एकत्रच लढणार मात्र जिल्हास्तरावर स्थानिक परिस्थतीनुसार लढविल्या जातील निवडणुका : अजित पवार

May 12, 2022

येत्या काही दिवसात महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढणार का? असा सवाल उपस्थित होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, आगामी निवडणुकीत राज्यस्तरावर महविकास आघाडीनं एकत्र लढली जावी असे आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र जिल्हा स्तरावर स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यायचा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, नाना पटोले यांनी खंजीर खुपसण्याचं वक्तव्य केलं हे हास्यास्पद आहे. मात्र नाना पटोले कुठल्या पक्षातून आले आहेत, हे सर्वांना माहिती आहे. मग भाजपने म्हणायचं का की नाना पटोले यांनी पाठीत खंजीर खुपसला, असा टोला त्यांनी लगावत पटोलेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला. अजित पवार म्हणाले की, राज्य स्तरावर वेगळे निर्णय असतात आणि स्थानिक पातळीवर वेगळे निर्णय होत असतात. काँग्रेसला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे तसाच आम्हाला देखील पक्ष वाढवण्याच्या अधिकार आहे. राज्यस्तरावर आमची शरद पवार यांनी बैठक घेतली होती. त्यामधे त्यांनी देखील आम्हाला हेच सांगितलं आहे. नाना पटोले यांनी सांगावं की त्यांनी आधी काँग्रेस सोडून भाजप, मग भाजप सोडून काँग्रेसमध्ये आले. झाकली मूठ सव्वा लाखाची असते, असे ही ते म्हणाले.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

मनमाड ता ८ : 'चला मग किल्ला बनवूया, मातीशी नाते जोडू या' हे ब्रीद वाक्य घेऊन आगामी शिवजयंती...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

मनमाड : इयत्ता १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2025 केंद्र क्रमांक 0236...

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण ,सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
.