loader image
[ays_poll id=7]

युवराज संभाजीराजे छत्रपतींची घोषणा ; राज्यसभा निवडणूक अपक्ष लढणार !

May 12, 2022

युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर करत होऊ घातलेल्या महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्ष लढणार असल्याची घोषणा त्यांनी ह्यावेळी केली संभाजीराजेंचा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर ते पुढे काय पाऊल उचलतात ह्याकडे सर्वांचे लक्ष लागून होते परंतु आता राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याची घोषणा संभाजीराजेंनी केली आहे. तसेच भाजपमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. संभाजीराजेंनी स्वराज्य या संघटनेची घोषणा ह्यावेळी केली. सगळ्या मराठा समाजला एका छताखाली आणण्यासाठी ही संघटना स्थापन केली असल्याची खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली राजकीय भूमिका जाहीर केली आहे. यावेळी संभाजीराजे म्हणाले की, दोन निर्णय मी घेतले आहेत. त्यातील पहिला निर्णय हा राज्यसभेच्या संदर्भात आहे. राज्यसभेचं समीकरण पाहिले असेल तर येत्या जुलैमध्ये ६ जागा रिक्त होणार आहेत. पूर्वीचे समीकरण काय तर ३ जागा भाजप, १ राष्ट्रवादी, १ शिवसेना आणि १ जागा काँग्रेस असे सहा जागांचे समीकरण आहे. परंतु आताचे समीकरण आहे की, २ जागा भाजप, १ राष्ट्रवादी, १ शिवसेना सहाव्या जागेचं संख्याबळ कमी असल्यामुळे कुठलाही एक पक्ष आणि कुठलीही १ आघाडी करु शकत नाही असे संभाजीराजेंनी सांगितले .

अजून बातम्या वाचा..

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

मनमाड ता ८ : 'चला मग किल्ला बनवूया, मातीशी नाते जोडू या' हे ब्रीद वाक्य घेऊन आगामी शिवजयंती...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

मनमाड : इयत्ता १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2025 केंद्र क्रमांक 0236...

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण ,सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
.