Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

भूमी क्रिकेट अकॅडमीचा चाळीसगाव क्रिकेट अकॅडमीवर विजय ; वेदांत कांदळकर सामनावीर तर सार्थक शिंदे सर्वोत्कृष्ठ गोलंदाज

May 14, 2022

शनिवार दि.१४ मे रोजी भूमी क्रिकेट अकॅडमी मनमाड विरुध्द चाळीसगाव क्रिकेट अकॅडमी या संघामध्ये झालेल्या सामन्यात भूमी क्रिकेट अकॅडमी संघाने २गडी राखत विजय प्राप्त केला. ३५ षटकांच्या सामन्यामध्ये चाळीसगाव संघाने नाणेफेक जिंकुन फलंदाजी करण्याचे ठरवले. चाळीसगाव संघाने प्रथम फलंदाजी करताना 35 षटकांत १० बळी गमवुन १३६ धावा केल्या.या धावांचा पाठलाग करत असताना मनमाड संघाने २२.४ षटकात हा सामना २ गडी राखत जिंकला. सर्वाधिक धावा करणारा मनमाड संघाचा फलंदाज वेदांत कांडळकर हा सामणावीर ठरला तसेच ७ षटकात २८धावा देऊन ४ बळी टिपणारा सार्थक शिंदे ( वय 10 वर्ष ) हा सर्वोत्कृष्ठ गोलंदाज ठरला. गोलंदाजी मध्ये भुमी संघातील यशवर्धन बरवट याने आपल्या संघासाठी २ बळी मिळवले.
भूमी क्रिकेट अकॅडमी, मनमाड चे संचालक व कोच सिध्दार्थ रोकडे यांनी या सामन्याचे आयोजन मनमाड येथे केले.
भूमी क्रिकेट अकॅडमी मनमाड चे मार्गदर्शक राजाभाऊ पगारे , जी एल एस गृप , परवेज शेख , हबीब शेख , सिद्धार्थ बरडीया , कौशल शर्मा , शुभम गायकवाड , नितीन आहिरराव , सनी अरोरा सर यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले. भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ इरफान भाई मोमीन यांनी खेळाडुंना शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]