नांदगाव तालुक्यात सप्टेंबर २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील शाकांबरी व लेडीं नदीला आलेल्या महापूरा ने शहराचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते
महापूराच्या पार्श्वभूमीवर व मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आणि भुसावळ रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक निरीक्षण अहवाला नुसार मटन मार्केट वाहतुकीसाठी अडथळा ठरत असल्याने आज अखेर मटन मार्केटसह गांधी चौक फरशी पुलावरील तसेच समता मार्ग(पंचाळ गल्ली) येथील अतिक्रमण काढण्यात आले. कुठलाही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून कारवाईच्या वेळी सकाळ पासून बंदोबस्त लावण्यात आला होता..
आज सकाळी मुख्यधिकारी तथा प्रशासक विवेक धांंडे यांना
मटन माक्रेट मधील अतिक्रमण धारकांनी आठ दिवसाचा अवधी मिळावा अशी मागणी केली होती. मात्र अवधी मिळणार नसल्याचे मुख्यधिकारी धांडे यांनी स्पष्ट सांगितले.अखेर मटन मार्केट मधील गाळे धारकांनी मार्केट मधील सामान हलविण्यासाठी काही वेळेचा अवधी देण्यात यावा अशी मागणी केली ‘काही वेळेचा अवधी देण्यात आला. त्यानंतर मटन मार्केट हटविण्यात आले .त्यानंतर गांंधी चौक फरशीवर पुलावरील अतिक्रमण धारकांनी स्वता:हुन आपली अतिक्रमणे (टपरी) काढून घेतली यानंतर समता मार्ग(पंचाळ गल्ली) टपरी धारकांनी आम्हाला सुध्दा टपरी हटविण्यासाठी वेळ मागून घेतला..काही तासानंतर स्वताहून टपऱ्या हटविण्यात आल्या आहेत..तसेच नवीन शॉपिंग सेंटरच्या जवळपास असलेले अतिक्रमणे काढण्यात आली.यावेळी पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अतिक्रमण मोहिमेत मुख्याधिकारी तथा प्रशासक विवेक धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल कुटे, बंडू कायस्थ, गणेश पाटील, अरुण निकम, मनमाड प्रभारी इंजिनिअर मयूर चौधरी,सुनील पाटील, अमृत काजळे श्रीमती मोरे, धनवटे, चोपडे, आनंद महिरे, तसेच मनमाड अग्निशमन दल,मनमाड नगरपरिषद कर्मचारी सहभागी झाले होते.













