नांदगाव शहरातील इंद्रायणी नगर / चांडकप्लॉट,जयभोले नगर येथील समस्यांच्या संदर्भात आज रिपाइंचे शहराध्यक्ष महावीर जाधव यांच्यासह परिसरातील रहिवाशांनी लाक्षणिक उपोषण केले यावेळी मोठया संख्येने नागरीक उपस्थित होते.
याबाबत सविस्तर माहिती अशी की आठ दिवसा पुर्वी जनतेच्या हितासाठी नगरपालिका प्रशासनाला खडबडून जागे करण्यासाठी लाक्षणिक उपोषणाचा इशारा रिपाइंचे शहराध्यक्ष जाधव यांच्या तर्फे निवेदनातून देण्यात आला होता. महिला वर्ग जेष्ठ मंडळी,तरुण वर्ग, लहान थोर मंडळी यांनी लाक्षणिक उपोषणात सर्वांनीच सहभाग नोंदवला होता याचे पडसाद उमटत नगरपालिका प्रशासनाने व सार्वजनिक बांधकाम उपविभाग नांदगाव यांनी त्वरीत दखल घेऊन जाधव व रहिवाशी यांच्याशी चर्चा करीत मागण्यांची त्वरीत दखल घेतली व लेखी आश्वासन देऊन जाधव यांना लाक्षणिक उपोषण मागे घ्यावे यासाठी त्यांनी विनंती केली .
लेखी आश्वासनात नगरपालिका प्रशासनाने पावसाळा सुरु होण्यापूर्वी सार्वजनीक हिताची कामे त्वरीत पूर्ण करण्यात येतील . त्याच प्रमाणे चांडक प्लॉट जयभोले नगर, परिसरातील अंतर्गत रस्ते, गटारीची कामे प्रस्तावित आहेत. निधी उपलब्धते नुसार सदरील कामे सुरु करण्यात येतील तरी लाक्षणिक उपोषण मागे घ्यावे असे सांगण्यात आले.
तर सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या लेखी आश्वासन पत्रकात असे म्हटले आहे की प्रभाग क्र ७ येथील उमाकांत घोंगाणे यांचे कादां खळे ते जयभोले नगर, स्मशान भुमी जवळ असलेल्या लेंडी नदीवर पुल बांधने तसेच शहरातून वाहणाऱ्या लेडीं नदीचे खोलीकरण नदीच्या लांबीला संरक्षित भिंत बांधणे या कामास शासन निर्णय मंजूरी मिळाली आहे .उपरोक्त कामे विहीत मुदतीत सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत पुर्ण करण्याचे आश्वासन लेखी स्वरूपात दिले आहे. भेंडी बाजार रेल्वे पुल ते मार्केट कमेटी गेट पर्यंत लेंडी नदीवरील विषयांकीत मंजुर पुल वगळून इतर काम आजपावेतो सा.बांधकाम उपविभागांतर्गत मंजूर नसल्याने शासनस्तरावर मान्यता प्राप्त झाल्यास कामे हाती घेण्यास शक्य होईल.असे स्पष्ट लेखी सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या मार्फत देण्यात आले. तर इंद्रायणी नगर (चांडक प्लॉट),जयभोले नगर, करीम चाळ रहिवासी यांनी मात्र वेळोवेळी मदतीला धावून येणारे आमदार सुहास कांदे यांनी आठ कोटी रुपयांचा रहिवाशांना तातडीने मंजूर केलेला निधी बद्दल विचारणा केली असता कुठल्याही प्रकारचे समाधान कारक उत्तर मिळाले नसल्याचे रहिवाशी यांनी नाराजी व्यक्त केली आहे
एक कोटी विस लाख रूपये मंजुर झाल्याचे सांगण्यात आले. प्रशासनाला आठ कोटी रुपयांचा निधी मिळाला नाही मग गेला कुठे.? असे अनेक प्रश्न रहिवाशांनी कुटे व चोळके यांच्यापुढे मांडल्याचे उघड उघड दिसत होते उपविभागीय अभियंता चोळके यांनी व नगरपालिकाचे कुटे यांनी महावीर जाधव यांना लिंबु सरबत देऊन लाक्षणीक उपोषण सोडले . शहरातील विविध समाजिक क्षेत्रातील तसेच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला मोठ्या संख्येने रहिवासी बांधव उपस्थित होते येत्या काही दिवसांत आमच्या अटी पूर्ण न झाल्यास झाशीची राणी लक्ष्मीबाई महिला मंडळाच्या वतीने धडक मोर्चा थेट नगरपालिका येथे काढण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे पुढे होणार्या जिवित हानीला फक्त आणि फक्त प्रशासनच जबाबदार राहील असे सर्व रहिवाशांनी बोलून दाखवले.
सोने व चांदीच्या दरात मोठी वाढ, काय आहेत आज सोने व चांदीचे दर?
आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बाजारात सोने व चांदीच्या दरांमध्ये मोठ्या...











