loader image
[ays_poll id=7]

बिबट्याच्या मुक्त संचाराने नीमोण परिसरात घबराटीचे वातावरण

May 20, 2022


चांदवड तालुक्यातील निमोण परिसरात दोन बिबट्याच्या संचाराने परिसरातील नागरिकांमध्ये विशेषतः शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही बिबट्यांचा वनविभागाने पिंजरा लावून बंदोबस्त करण्याची मागणी निमोण, वाद वराडी परीसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

मंगळवारी (ता. १७) डोंगरालगत शेती असलेल्या विष्णू काळे यांच्या जर्सी गायीचा फडशा या बिबट्याने पाडल्याचा संशय येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केला होता. सकाळी या परीसरातील शेतकरी मच्छिंद्र बाराहाते, कुंदन देवरे, गोरख सोनवणे, रतन सानप, बाळू सानप, वैभव देवरे, योगेश रायते, समाधान रायते, बाळू काळे आदींनी प्रत्यक्ष या दोन्ही बिबट्यांना पाहिले असल्याने अजूनच भितीचे वातावरण निर्माण
झाले आहे. यापूर्वीही कुंदन देवरे व इतर शेतकऱ्यांची जनावरे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली आहेत. यामुळे शेतकरी दहशतीत आहेत. वनविभागाने तत्काळ पिंजरा लावून या दोन्ही बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नीमोण व परीसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी आपापली जनावरे सांभाळावी व आपल्या वनहद्दीत जाऊ नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.