Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगावला दुचाकी व कार ची समोरासमोर धडक : एक ठार, दोन जखमी

May 20, 2022

नांदगाव – औरंगाबाद रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलाजवळ मोटार सायकल व टोयोटो कंपनीची कार यांच्यात अपघात होवून एक जणाचे  दवाखान्यात नेत असताना निधन झाले तर एक जण गंभीर जखमी झाला
याबाबत वृत असे की नांदगाव शहरा जवळील रेल्वे उड्डाण पुलाजवळ मोटार सायकल व टोयोटो कंपनीची कार एम . एच . १५ डी एस ९३९० यांच्यात समोरा समोर अपघात होवून मोटार सायकल चालक समाधान जगंलू गायकवाड ( रा. इंदीरानगर कळमधरी) यांचे मालेगाव येथे दवाखान्यात नेत असतानां निधन झाले तर मागे बसलेला विलास शंकर धोत्रे हा गंभीर जखमी झाला असून त्यास मालेगाव येथे दवाखान्यात भरती केले आहे. अपघात होताच मोटारसायकल हवेत उंच उडाली व तिने पेट घेतला यामध्ये मोटारसायकल जळून पुर्ण खाक झाली . कारचालक घनश्याम हनुमंत निकम रा पंचवटी नाशिक हे जखमी झाले असून त्यांच्यांवर नांदगाव ग्रामीण रूग्णालयात उपचार चालू आहे.
नांदगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून पुढील पो. नि. रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शना खाली पो. ह. राजू मोरे हे करीत आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

मनमाड महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे भारतीय राज्यघटनेचे...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड मध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड मध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात...

read more
महाविद्यलयीन विद्यर्थ्यांसाठी खूशखबर, ऑफलाईन परीक्षांसाठी प्रती तास 15 मिनिटे वाढीव वेळ

महाविद्यलयीन विद्यर्थ्यांसाठी खूशखबर, ऑफलाईन परीक्षांसाठी प्रती तास 15 मिनिटे वाढीव वेळ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान झाले आहे. मागील दीड वर्ष शाळा,...

read more
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या अनुषंगाने मनमाड शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गावरील वाहतुकीत बदल

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या अनुषंगाने मनमाड शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गावरील वाहतुकीत बदल

कोविड- २०१९ नियम शिथील झाल्याने चालू वर्षी सन २०२२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठया...

read more
तीन हजार पुस्तके वापरत साकारली बाबासाहेबांची प्रतिकृती चांदवड चे कलाशिक्षक देव हिरेंचे महामानवास अनोखं अभिवादन

तीन हजार पुस्तके वापरत साकारली बाबासाहेबांची प्रतिकृती चांदवड चे कलाशिक्षक देव हिरेंचे महामानवास अनोखं अभिवादन

१४ एप्रिल अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस. पुस्तकांसाठी भव्य असं घर बांधणाऱ्या या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]