loader image
[ays_poll id=7]

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित!

May 21, 2022


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५ जून रोजी होणारा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला असल्याचे राज ठाकरेंनी स्वत: ट्विट करत तूर्तास दौरा स्थगित केल्याची माहिती दिली आहे. २२ मे रोजी सकाळी १० वाजता पुण्यातील गणेश कला क्रिडा केंद्रात यावर सविस्तर बोलूच असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. सध्या दौरा स्थगित झाल्याने राज ठाकरे पुण्यातील सभेतून अयोध्या दौऱ्याची नवी तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे. यासंदर्भात राज ठाकरे शिवतीर्थावर मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक किंवा पत्रकार परिषद घेत दौरा रद्द करण्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करू शकतात.राज ठाकरे यांच्या ह्या अयोध्या दौऱ्याला भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला असून उत्तर भारतीयांचा अपमान केल्याबद्दल राज ठाकरेंनी प्रथम जाहीरपणे माफी मागितल्याशिवाय त्यांना उत्तर प्रदेशात येऊ दिले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता.
राज ठाकरेंनी आपल्या भाषणांमधून उत्तर भारतीय जनतेचा अपमान केल्याचा आरोप बृजभूषण सिंह यांनी केला असून राज ठाकरेंचा अयोध्या दौरा अधिकचं चर्चेत आला आहे मात्र आता राज ठाकरेंचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केल्याचे ट्विट स्वतः ठाकरे यांनी केल्याने ह्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे
अयोध्या दौरा स्थगितीबाबत राज ठाकरे पुण्यातील सभेतून स्पष्टीकरण देतात की दौऱ्याची नवीन तारीख जाहीर करतात याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.


अजून बातम्या वाचा..

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.