Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

इंधन दर : केंद्र सरकार पाठोपाठ राज्य सरकारचाही जनतेला दिलासा

May 23, 2022

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करत सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. केली आहे.

शनिवारी केंद्र सरकराने अबकारी कर कमी करत पेट्रोलच्या दरात ९.५रुपयांची तर डिझेलच्या दरात ७ रुपयांची कपात केली. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी राज्य सरकारांना करात कपात करण्याची विनंती केली होती. त्यानंतर केरळ आणि राजस्थान सरकारने पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केला. दरम्यान, महाराष्ट्रात इंधनावरील करामुळे पेट्रोल आणि डिझेल शेजारच्या राज्यांपेक्षा तुलनेनं महाग मिळतं. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही कर कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी होत होती. त्यानंतर राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलच्या करात सूट जाहीर केली. त्यामुळे आता पेट्रोल २.०८ तर डिझेल १.४४ रुपयांनी स्वस्त होईल.

दरम्यान, राज्य सरकारच्या कर कमी करण्याच्या या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक अडीच हजार कोटींचा बोजा पडणार आहे.

अजून बातम्या वाचा..

जागतिक पर्वत दिनाच्या निमित्ताने मनमाड ट्रेकर्स तर्फे अंकाई किल्ल्यावर पर्वत पूजन व पर्वत रक्षणाची प्रतिज्ञा

जागतिक पर्वत दिनाच्या निमित्ताने मनमाड ट्रेकर्स तर्फे अंकाई किल्ल्यावर पर्वत पूजन व पर्वत रक्षणाची...

read more

छगन भुजबळ,खा प्रफुल पटेल आणि समीर भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासाठी घेतल्या जेष्ठ विधिज्ञांच्या भेटी

ओबीसी आरक्षणावरून देशातील इतर राज्यांना वेगळा आणि महाराष्ट्राला वेगळा नियम का…? असा सवाल उपस्थित...

read more

बाजार समित्यांना बळकट करण्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम सुधारणा करणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षस्थानी राज्यातील बाजार समित्यांना अधिक बळकट करण्यासाठी...

read more

तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख (CDS) बिपिन रावत यांचं तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन..

आज दुपारी तामिळनाडूच्या कुन्नूर भागात भारतीय वायुदलाचं एमआय १७ ५ व्ही हे अत्याधुनिक आणि उच्च...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]