Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

विज बिले वेळेत भरून सहकार्य करा अन्यथा वीज पुरवठा खंडित करा ; सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे ह्यांचे निर्देश

May 23, 2022

राज्यभरात ग्राहकांना अखंडित वीजसेवा देणाऱ्या महावितरणची आर्थिक घडी विस्कटल्याने व अन्य कोणताही पर्याय नसल्याने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची नाईलाजास्तव कटू कारवाई होणार असून महावितरणच्या आर्थिक स्थितीचा गांभिर्याने विचार करून थकीत व चालू वीजबिलांचा वेळेत भरणा करून वीजग्राहकांनी सहकार्य करावे. यामध्ये सहकार्य न करणाऱ्या ग्राहकांचा नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे(भाप्रसे) यांनी दिला .
ते नाशिक येथील महापारेषणच्या आवारात असलेल्या सभागृहात नाशिक व मालेगाव मंडळातील सर्व कार्यकारी अभियत्यांची व उपविभागीय अभियंत्यांची आढावा बैठक सोमवारी दि. २३ मे २०२२ रोजी घेतली. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी महावितरणच्या नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर, नाशिक मंडलाचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर आणि मालेगाव मंडळाचे अधिक्षक अभियंता रमेश सानप व्यासपीठावर उपस्थित होते.
कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे पुढे बोलतांना म्हणाले की, ग्राहकांना दरमहा त्यांनी वापरलेल्या विजेचे देयक मीटर रीडिंगच्या माध्यमातून वाचन करून अचूक, योग्य व वेळेत देयक देण्यासाठी मीटर एजन्सीं नेमण्यात आलेल्या आहेत. या एजन्सींना मीटर वाचन करताना फोटोंचा दर्जा सुधारण्यास व अचूक काम करण्यास सांगितले सांगितले आहे, मात्र कार्यक्षमता न सुधारल्यास संबंधित मीटर रिडींग एजन्सींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. ना नफा, ना तोटा तत्वाने वीजसेवा देणाऱ्या महावितरणवर एक ग्राहक म्हणून वीजखरेदी, पारेषण खर्च तसेच विविध कर्ज व त्याच्या हप्त्यांचे सद्यस्थितीत करोडो रूपयांचे दायित्व आहे. दुसरीकडे महावितरणच्या वीजग्राहकांकडे थकबाकीचा मोठा डोंगर आहे. या गंभीर आर्थिक संकटामुळे महावितरणच्या अस्तित्वाचा सध्या बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे. आजच्या घडीस वीज ही एक मूलभूत गरज असताना आज ग्राहक मोबाईल, डिश टी.व्ही., विजेवरील उपकरणे इत्यादी बिलाचा ठराविक वेळेत भरणा केला जातो. मात्र दुर्दैवाची बाब की, अतिशय मुलभूत गरज असलेल्या विजेचे बील भरण्यास ग्राहकांकडून फारसे प्राधान्य दिले जात नाही, अशी खंत सुद्धा व्यक्त करीत अशा ग्राहकांवर कारवाई करण्याचे निर्देश सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिले.
यावेळी महावितरणच्या नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी सुद्धा संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून नाशिक व मालेगाव मंडळातील विविध विषयाचा आढावा घेऊन या महिन्यात वीज देयक वसुलीसह ग्राहकसेवा आणखी गतिमानतेने करण्याचे आवाहन केले. बैठकीला नाशिक व मालेगाव मंडळातील सर्व कार्यकारी अभियंते, अभियंते, अधिकारी व मीटर रिडींग एजेन्सीचे कर्मचारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]