loader image
[ays_poll id=7]

मुंबईत आता दुचाकीस्वारासह मागे बसणाऱ्या व्यक्तिलाही हेल्मेट सक्ती !

May 25, 2022


दुचाकी चालवणाऱ्या चालकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबईत आता दुचाकी चालवणाऱ्यासह मागे बसणाऱ्या व्यक्तीला हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी हा आदेश काढला असून, 15 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. त्यानुसार, दुचाकीस्वार आणि मागे बसणाऱ्या व्यक्तीला पुढच्या 15 दिवसात हेल्मेट वापरणे बंधनकारक असेल. त्यामुळे आता दुचाकी चालवताना दोघांनाही हेल्मेट घालणे बंधनकारक असणार आहे.

वाहतूक विभागाकडून पुढील 15 दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच, नियम न पाळणाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. दुचाकीलस्वार आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्ती यांनी दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे वाहन कायदा 1988 कलम 129 सह 194 (ड) अन्वये बंधनकारक आहे. विना हेल्मेट मोटारसायकल चालविल्यास मोटार वाहन कायद्यामध्ये 500 रुपये दंड तसेच 3 महिन्यांसाठी लायसन्स निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.वाहतूक विभागाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकाव्दारे नागरिकांना विनंती करण्यात आली आहे की, मोटार सायकलस्वार आणि त्यांच्या पाठीमागे बसलेली व्यक्ती यांनी हेल्मेट वापरावे अन्यथा येत्या 15 दिवसानंतर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येणार असल्याचं वाहतूक विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, कोणतेही वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याच्या सुचना वारंवार वाहतूक पोलिसांकडून दिल्या जातात. मात्र, अनेकदा दुचाकीस्वार या नियमांचे उल्लंघन करतात. त्यामुळे त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे लागते. अशातच आता, चालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक विभागाने हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट घालणे बंधनकारक असणार आहे.


अजून बातम्या वाचा..

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
.