loader image
[ays_poll id=7]

प्रकाशा(शहादा) येथील सराफी दुकानातून सोन्याची पोत चोरणाऱ्या लासलगावच्या महिलेला मुद्देमालासह शिताफीने अटक

May 25, 2022

सराफ दुकानात गर्दीचा फायदा घेऊन सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या लासलगाव येथील महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.शहादा पोलिस स्थानकाने सराफ दुकानातून चोरी करणा-या महिलांचे व्हॉटसअपवर फोटो व्हायरल केल्यानंतर सदर फोटोच्या माहितीच्या आधारे लासलगाव पोलिसांनी संजयनगर येथील महिला सरला कापसे (वय ३० वर्षे) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून ९० हजार रुपयाचे सोन्याचे दागिने जप्त केले. या महिलेच्या राहत्याघरी महिला अंमलदार सोनाली शिंदे यांनी संबंधित महिलेची अंग झडती घेतली असता तिच्या ताब्यात सोन्याची पोत, मनी , मंगळसूत्र मिळून आले. सदर सोन्याच्या वस्तुबाबत तिच्याकडे विचारपुस केल्यानंतर तिने उडवा उडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर या महिलसे पोलीसी खाक्या दाखविताच महिलेने मीना कापसे, रामदास शिंदे यांचे सोबत परिणीता ज्वेलर्स, प्रकाशा, ता शहादा जिल्हा नंदूरबार येथून चोरी केल्याची कबुल केले. ही कामगिरी सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अजिनाथ कोठाळे, पोहवा कैलास महाजन, पोना संजय देशमुख, उषा आहेर पोकॉ प्रदिप आजगे, सोनाली शिंदे, माया वाघ यांच्या पथकाने केली. या चोरी प्रकरणी शहादा येथील अश्विन बाळकृष्ण सोनार यांनी फिर्याद दिली असून शहादा पोलीस ठाण्यात भादवि कलम ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयाचा तपास लासलगाव पोलिसांनी लावला.

अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.