loader image
[ays_poll id=7]

NIA ने ठोठावली शिक्षा : दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवणाऱ्या यासीन मलिक ला जन्मठेप

May 25, 2022


काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी कोर्टाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली. एनआयए कोर्टाने आज यासिन मलिकला शिक्षा सुनावली. यासिन मलिक याने याआधीच काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर एनआयए विशेष कोर्टाने १९ मे रोजी त्याला दोषी ठरवले होते. आज एनआयए कोर्टात शिक्षेवर सुनावणी झाली. एनआयएने यासिन मलिकला फाशीच्या शिक्षेच्या मागणी केली होती. यासिन मलिकविरोधात देशविरोधी कारवायाचा आरोप होता. मलिक विरोधात ‘युएपीए’ कायद्यातील कलमांसह इतरही अनेक गुन्हे दाखल आहेत.
एनआयएने मलिकसाठी कलम १२१ अंतर्गत जास्तीत जास्त शिक्षेची मागणी करून,या प्रकरणात फाशीची शिक्षा मोठी असून किमान शिक्षा जन्मठेपेची आहे. यासिन मलिकने दिल्लीतील एनआयए कोर्टात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती. त्यानंतर कोर्टाने १९ मे पर्यंत सुनावणी टाळली होती. मलिकने कोर्टाला सांगितले की, त्याच्या विरोधात लावण्यात आलेल्या आरोपांना आव्हान देणार नसल्याचे म्हटले होते.


हे हि वाचा राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात होणार ५० हजार कोटींची गुंतवणूक; ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या प्रयत्नांना यश


यासिन मलिक विरोधात युएपीए कायद्यातील कलम १६ (दहशतवादी कायदा), १७ (दहशतवादी कृत्यासाठी निधी उभारणे), १८ (दहशतवादी कृत्य करण्याचा कट) आणि २० (दहशतवादी टोळीचा सदस्य) आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याशिवाय, भारतीय दंड विधान कायद्यातील १२०-ब (गुन्हेगारी कट) आणि १२४-अ (देशद्रोह) आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यासिन मलिकने जम्मू-काश्मीरच्या स्वातंत्र्य लढ्याच्या नावाखाली जगभरातून बेकायदेशीर आणि दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारला असल्याचे कोर्टाने याआधी म्हटले होते. कोर्टाने काश्मीरमधील फुटीरतावादी नेता फारुख अहमद उर्फ बिट्टा कराटे, शाबीर शाह, मसरत आलम, मोहम्मद युसुफ शाह, आफताब अहमद शाह, नयीम खान, मोहम्मद अकबर खंडय, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद भट, झहूर अहमद शाह वातली, शबीर अहमद शाह, नवल किशोर कपूर आदींविरोधात आरोप निश्चित केले आहेत. त्याशिवाय लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद आणि हिज्बुल मुजाहिद्दीन संघटनेचा म्होरक्या सल्लाउद्दीन विरोधातही आरोप निश्चित केले आहेत.


अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.