loader image
[ays_poll id=7]

नांदूर येथील २२ वर्षीय तरुणाचा खून,हातपाय बांधत नाग्या साक्या धरणात फेकले ;दोन संशयितांना पोलिसांनी केली शिताफीने अटक

May 25, 2022


नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : नांदगाव तालुक्यातील नांदूर येथील अमोल धोंडीराम व्हडगर (२२) यांचा गळा व हातपाय दोराने बांधून नाग्या साक्या धरणात फेकून देवून खून करण्यात आला असून पोलिसांनी संशयीत आरोपीचा शोध घेवून अटक केली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मयत अमोल व्हडगर यांचे बंधू राजेंद्र व्हडगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नांदूर अमोल व्हडगर (वय २२ ) हा गावातील केसकर यांच्याकडे असलेल्या वरातीत नाचून येतो, असे सांगून रविवारी (दि. २२) रात्री १०:३० वाजता घरातून गेला होता. मात्र, त्यानंतर तो घरी परतलाच नाही. अमोलच्या नातेवाइकांनी दोन दिवस शोध घेऊन मंगळवारी सकाळी नांदगाव पोलिसात हरवल्याबाबत फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला असताना  मंगळवारी (दि. २४) दुपारी नाग्या साक्या धरणातील सांडव्याजवळ मृतदेह तरंगत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आल्याने ही बाब उघडकीस आली . या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवित सोनू साहेबराव केसकर(२२)गोविंदा वाळू  केसकर(२७) रा.नांदूर( ता.नांदगाव) या  संशयीतांना अटक केली असून मनमाड येथील पोलीस उपविभागीय अधिकारी समरसिंह साळवे,  पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिपक सुरवाडकर पीएसआय मनोज वाघमारे,पो.ह.सावकारे, दिपक मुढे,सागर कुमावत आदी तपास करीत आहेत..


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.