मेष :- मनाची चलबिचलता जाणवू शकते. हातापायाच्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका.
वृषभ :- विचारांना अधिक चालना देऊन पहावे. मित्रांशी वादाचे प्रसंग टाळावेत.
मिथुन :- नवीन ओळख भविष्यात व्यावसायिक गोष्टीत याच उपयोग होईल. कोणावर जास्त विश्वास दाखवू नका.
कर्क :- सामाजिक क्षेत्रात नवीन ओळखी होतील. प्रश्न सामोपचाराने सोडवा. कामातील निर्णय योग्य ठरतील.
सिंह :- अनोळखी लोकांशी व्यवहार टाळा. संमिश्र घटना घडू शकतात.
कन्या :- मत मांडताना आक्रमकता दर्शवू नका. तडजोडीने मार्ग काढावा.
तूळ :- बोलतांना इतरांच्या भावनेचा विचार करावा. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल.
वृश्चिक :- अचानक धनलाभ संभवतो. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.
धनू :- कामातून इतर गोष्टींकडे लक्ष जाऊ शकते. तरूणांकडून नवीन विचार जाणून घ्याल.
मकर :- तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल. कमिशन मधून लाभ मिळेल.
कुंभ :- जुगारातून लाभ संभवतो. कौटुंबिक समस्या जाणून घ्याव्यात.
मीन :- मानसिक शांतता लाभेल. कोणतीही गोष्ट अविचाराने करू नका.




