loader image
[ays_poll id=7]

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात

May 30, 2022

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली असून ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि भाग एक आजपासून भरता येणार आहे.

मुंबई महानगर, पुणे , पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या विभागांमध्ये अकरावी ऑनलाइन प्रवेशाची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे.

प्रत्यक्ष अर्ज नोंदणी आणि अर्जाचा भाग एक भरण्यासाठी आजपासून सुरुवात होईल. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करून लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळवायचा आहे. तसेच अकरावी प्रवेशाचा भाग 1, ऑनलाइन शुल्क आणि अर्ज प्रमाणित करण्यासाठी मार्गदर्शक केंद्र निवडायचं आहे. तर दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी आपला पसंती क्रमांक देऊन अर्जाचा भाग-2 भरायचा आहे.
विद्यार्थ्यांनी https://11thadmission.org.in/

या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करून त्यानंतर लॉग इन आयडी आणि पासवर्ड तयार करायचा आहे. लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करून इयत्ता ११वी प्रवेशासाठीच्या अर्जाचा भाग १ भरायचा आहे. ऑनलाईन शुल्क भरून फॉर्म लॉक करावयाचा आहे.

अर्ज प्रमाणित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केंद्र निवडायचे आहे. मार्गदर्शन केंद्र किंवा माध्यमिक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी आपला अर्ज प्रमाणित करून घ्यायचा आहे.

प्रत्यक्ष अर्ज नोंदणी आणि भाग 1 भरण्याचं वेळापत्रक 30 मे 2022 पासून:

  1. ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि प्रवेश अर्ज 1 भरणं, अर्ज प्रमाणित करणे (ऑनलाईन अर्ज करून विद्यार्थ्यांनी लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळविणे तसेच अकरावी प्रवेशाचा भाग 1 भरणं, ऑनलाईन शुल्क भरणं, अर्ज प्रमाणित करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रं निवडणे.
  2. विद्यार्थ्यांनी भरलेल्या माहितीचा अर्ज तपासून प्रमाणित करणं 30 मे 2022 पासून ते राज्य मंडळाच्या निकालापर्यंत.
  3. उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी आपली माहिती तपासून अंतिम करणे.
  4. शिक्षण उपसंचालकांनी शाळा / कनिष्ट महाविद्यालयांची माहिती तपासून द्यावी.
  5. दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग 2 भरून प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांची पसंतीक्रम नोंदविणं तसेच कोटांतर्गत राखीव जागेवरील प्रवेशासाठी पसंतीची महाविद्यालये निवडणे आणि ऑनलाईन नमूद करणे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश महात्मा गांधी...

read more
भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत फुलवाणी नगर मध्ये 105 वृक्षा चे रोपण

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत फुलवाणी नगर मध्ये 105 वृक्षा चे रोपण

भारतीय जनता पक्ष राजकारण करीत असताना सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजपयोगी उपक्रम राबवित असते याच...

read more
जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे संपन्न झालेल्या १९ वर्ष आतील मुले मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने )...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नाशिक...

read more
.