loader image

डॉ प्रणित सोनावणे यांचे ” बायो इंटॅक्ट ” तंत्रज्ञानामुळे सांधे प्रत्यारोपणाचे एका महिन्यात अर्धे शतक

May 31, 2022

नाशिक : प्रतिनिधी  अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नाशिक येथील सुप्रसिद्ध सांध्येप्रत्यारोपण शस्त्रक्रिया तज्ञ् डॉ प्रणित सोनावणे यांनी मे महिन्यात  “बायो इंटॅक्ट ” या  तंत्रज्ञानामुळे ५० यशस्वी सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा टप्पा पार केला. वयानुरूप होणारी गुडघ्याची झीज त्यावर उपचार म्हणून सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करावी लागते. या  शस्त्रक्रियेदरम्यान अचूकता आवश्यक असते. ही अचुकता प्राप्त करणे अनेकदा पारंपारिक पद्धतीने शक्य नसल्याने अशावेळी ” बायो इंटॅक्ट ” या आधुनिक तंत्रज्ञानाने गुडघा प्रत्यारोपण प्रभावी ठरते. “बायो इंटॅक्ट नी- रिप्लेसमेंट ” ही शस्त्रक्रिया महागडी नसून पारंपरिक गुडघा प्रत्यारोपण सर्जरी साठी जेवढा खर्च येतो तेवढाच खर्च त्यास येतो, हे विशेष.
 अशोका मेडीकव्हर हॉस्पिटलचे सांधेरोपण तज्ञ डॉ. प्रणित सोनवणे या प्रसंगी म्हणाले की , आज भारतात अधिक शस्त्रक्रिया पारंपरिक पद्धतीने करण्यात येत असल्या तरी, अचूकतेमुळे व आधुनिक तंत्रज्ञानामुळे  गुडघ्याचे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया प्रचलित होत आहे. ” बायो इंटॅक्ट ” या आधुनिक तंत्रज्ञानामुळे   शस्त्रक्रियेमध्ये   स्नायूचे आणि सांध्याचे  नैसर्गिक गुणधर्मापर्यंत पोहोचून अचुकता प्राप्त करता येऊ शकते. याशिवाय कमी काप , हाडांचे कमी नुकसान, पेशी व उतींना ( टिश्यू) कमी हानी होत असल्याने या शस्त्रक्रिया रुग्णांना लाभदायक ठरत आहे.अनेकदा गुडघ्यांच्या वेदना असाह्य आहेत म्हणून गुडघे बदलून टाका. असे ही रुग्ण आम्हाला स्वतःहून सांगतात. मात्र त्यापूर्वी वेदनांची तीव्रता आणि ते दुखणे किती जुनाट आहे यावर मूल्यांकन करून उपाय ठरवावा लागतो. जर कुठलाच उपाय शक्य नसेल तर शेवटी गुडघा प्रत्यारोपण करावे लागते मात्र बायो इंटॅक्ट या आधुनिक तंत्रज्ञानामुळे  आता गुडघा प्रत्यारोपण अचूक व परिपूर्ण होत असल्याने रुग्णांना त्याचा फायदा होत आहे.
  गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्यावर दुसऱ्याच दिवशी रुग्ण चालू शकतो. दरम्यान रुग्णास  फिजोथेरिपी चे व्यायाम करविल्या जातात. कालांतराने रुग्ण चालणे फिरणे, वाहन चालवणे, जिने चढणे उतरणे ,मांडी घालून बसणे या क्रिया सहजतेने करू शकतात.गुडघ्यामध्ये असलेल्या कार्टलेजचा थर झिजल्याने गुडघ्याचे कार्यान्वयन बिघडते. त्यामुळे चालण्यास त्रास होतो, गुडघा दुखतो व त्यावर सूज येते, पायाच्या आकारमानात असमानता येते. वयोमानानुसार गुडघ्याचे कार्टिलेज झिजल्या जातात; तरीदेखील अपघातामुळे व लिगामेंट इंज्युरीमुळे कमी  वयातही हे  कार्टिलेज   झिजल्या जाऊन गुडघा दुखावू शकतो. गुडघ्यातील ही झीज पहिल्याच टप्प्यात आढळून आली, तर औषधोपचार आणि फिजियोथेरपीसारख्या उपचार प्रणालींमुळे तात्पुरता आराम पडतो. मात्र, गुडघे जास्त प्रमाणात झिजल्या गेल्यास त्यावर गुडघ्यांचे प्रत्यारोपण हा एक प्रभावी उपचार आहे.
 अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल हे उत्तर महाराष्ट्रातील  अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे ३५० बेडेड ‘ऑथोपेंडिक्स जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर ‘ आहे. येथे  गुडघा प्रत्यारोपणासह टोटल हीप रिप्लेसमेंट, टोटल शोल्डर रिप्लेसमेंट, रिविजन जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी, ऑर्थरोस्कोपी, लिगामेंट व स्पोर्ट्स इंज्युरी, शोल्डर सर्जरी, शोल्डर टेंडन रिपेअर, टेंडन इंज्युरी यासह स्पाईन सर्जरी व फ्रॅक्चर व ऑक्सिडेंट यावर उपचार करण्यात येतात .
समीर तुळजापूरकर – केंद्र प्रमुख अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नाशिक

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.