loader image
[ays_poll id=7]

पानेवाडीकरांच्या जागा मालकांचा मोजणीस विरोध ; भूमी अभिलेख चे अधिकारी परतले मोजणी न करताच

Jun 1, 2022

पानेवाडी शिवारातील न्यू इंग्लिश शाळेशेजारी १४ शेतकऱ्यांच्या मालकीची असलेली ४५ एकर परिसरातील जागेत हिंदुस्थान पेट्रोलियम कोर्पोशन लिमिटेड कंपनीच्या रेल्वे साईडिंग व व्हॅगन गॅटरी ( रेल्वे टॅंकर्स लोडींग अनलोडींग ) चा प्रस्तावित प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यासाठी नांदगाव येथून आलेल्या भुसंपादन अधिकाऱ्यांना तसेच कंपनीच्या अधिकाऱ्यांना तेथील ग्रामस्थांनी मंगळवारी प्रखर विरोधाला सामोरे जावे लागले व तेथून काढता पाय घ्यावा लागला.
हिंदुस्थान पेट्रोलियम कोर्पोशन लिमिटेड कंपनीतर्फे उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पातील जमिनीचा समृध्दी महामार्गाच्या धर्तीवर मोबदला तसेच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना कायम स्वरूपी नोकऱ्या व इतर मागण्यांसंदर्भात जोपर्यंत लेखी करार होत नाही.तो पर्यंत आम्ही जमिन मोजणीस विरोध करणार आहोत.अशी भूमिका यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त करण्यात आली. तसेच भूमापन कार्यालयामार्फत व कंपनीतर्फे ज्यांची जमीन मोजणी सुरू करण्यात आली.त्यांना कोणतीही नोटीस किंवा पूर्व सूचना देण्यात आली नाही.जबरदस्तीने मोजणी सुरू करण्यात आली . त्यास आमचा विरोध व हरकत आहे.कोणत्याही परिस्थितीत आम्हाला आमची जमीन द्यायची नाही यावेळी ग्रामस्थांनी संबंधितांना निवेदन दिले . त्यामुळे आज मंगळवारी पानेवाडीत आलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना व नांदगाव येथील भुमि अभिलेख कार्यालयातील मोजणी अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले.
यावेळी पानेवाडी येथील संबंधित ४५ एकर शेतजमिनी मालकांपैकी वाल्मिक रघुनाथ आहिरे , संजय वाळूबा सांगळे , गोकुळ दादा सांगळे , प्रेमराज दादा सांगळे , दत्तू मोहन सांगळे , रामनाथ दत्तू सांगळे , काळू मोहन सांगळे , दत्तू उत्तम वाघ , दत्तू अशोक काकड , दगडूबाई वाघ आदींसह महिलासह एचपीसीएलचे अधिकारी अनिल मिश्राम , किरण मैत्र , भूमापन अधिकारी एन.जी.आहिरे , जे.के.शेख , मनमाडचे प्रभारी पोलिस निरिक्षक पी.बी. गिते, उपनिरीक्षक गौतम तायडे आदींसह मोठ्या प्रमाणावर पोलीसांचा फौजफाटा , कंपनीचे कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
.