loader image
[ays_poll id=7]

दहावी निकालापूर्वीच चांदवड तंत्रनिकेतनात प्रवेश सुविधा केंद्र सुरु

Jun 3, 2022


चांदवड: येथील श्री नेमीनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्री एच.एच.जे.बी. पॉलिटेक्निक महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२२-२3 करिता प्रथम व थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा (पदविका) प्रवेशासाठी प्रवेश सुविधा केंद्र (Facilitation Center) म्हणून तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्याकडून मान्यता मिळालेली आहे.

दि. ०२/०६/२०२२ रोजी झालेल्या तंत्रशिक्षण विभागाची बैठक संपन्न झाली. त्यात दहावीच्या निकाल लागण्यापूर्वीच तंत्रनिकेतनात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यास अनुमती देण्यात आली आहे. सर्व 10 वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सुचीत करण्यात येते कि, येत्या दोन ते तीन दिवसात याबाबतचे dte वेबसाईटवर पॉलिटेक्निक प्रवेशाबाबत नियमावली व माहितीपुस्तिका उपलब्ध होणार आहे. तसेच डिप्लोमा (पदविका) प्रवेशासाठी कुठलीही (CET) प्रवेश परीक्षा नाही- याबाबतचे परीपत्रक तंत्रशिक्षण मंडळाकडून काढण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरतेवेळी दहावीचा बैठक क्रमांक लागणार आहे व तो आपल्या शाळेतून मिळवू शकतात. सोबत फक्त ई-मेल आयडी, मोबाईल नंबर व डेबिट कार्ड/क्रेडीट कार्ड / UPI/Internet बँकिंग आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आता गुणपत्रिका व शाळा सोडल्याचा दाखल्याची सद्या गरज नाही. त्यामुळे दहावीच्या व बारावीच्या विद्यार्थ्यांनी निकालाची वाट न पाहता व ऑनलाईन अर्ज त्वरित भरावेत असे आवाहन पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. व्ही.ए. वानखेडे यांनी केले आहे.

तरी प्रवेश प्रक्रियेसाठी समन्वयक प्रा.एच.आर. मेतकर मोबाईल क्रमांक ९४०४७८८५५१ व प्रा. ए. एस. अजमेरे ९४२२३२२५७७ यांच्याशी संपर्क साधावा. विश्वस्त समितीचे अध्यक्ष मा.श्री बेबीलालजी संचेती व विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष मा. श्री दिनेशजी लोढा, मानद सचिव मा.श्री जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष मा.श्री अजीतकुमारजी सुराणा, प्रबंध समितीचे उपाध्यक्ष आणि तंत्रनिकेतनाचे समन्वयक मा. श्री अरविंदकुमारजी भन्साळी, सह मानद सचिव मा.श्री. झुंबरलालजी भंडारी, व तंत्रनिकेतनाचे मुख्य समन्वयक तथा प्रबंध समिती सदस्य मा. श्री राजेंद्रकुमारजी बंब यांनी प्रवेश सुविधा केंद्र (Facilitation Center) मिळाले म्हणुन सर्वांचे अभिनंदन करून समाधान व्यक्त केले.


अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.