Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा

Jun 5, 2022

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे आज दिनांक ०५ जून २०२२ रोजी ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करून जागतिक पर्यावरण दिन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. याप्रसंगी पर्यावरण तज्ञ प्रा. डॉ. प्रवीण सप्तर्षी सर हे प्रमुख वक्ते होते. त्यांनी आपल्या मनोगतातून , मानवाला ज्ञात असलेल्या विश्वामध्ये फक्त पृथ्वी वरच मानवी जीवन आहे आणि हे असेच टिकवून ठेवायचे असेल तर पर्यावरणाचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे. तसेच ओझोन वायूचे महत्व, जागतिक तापमान वाढ, सागर पातळीतील बदल, आर्थिक विषमता इत्यादी मुद्यांना अनुसरून त्यांनी पर्यावरणाचे महत्त्व विषद केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे संचालक व निमगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम सर तसेच एम.एस. जी. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. सी.एम.निकम सर उपस्थित होते.याप्रसंगी मनमाड महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.प्रमोद आंबेकर सर, प्रा.डी. व्ही. सोनवणे व महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयातील भूगोल विभाग प्रमुख प्रा. सुरेश पगार सर यांनी केले. सूत्रसंचालन व प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. गणेश गांगुर्डे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. प्रकाश बर्डे सर यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]