loader image
[ays_poll id=7]

जागतिक युथ स्पर्धेसाठी आकांक्षा किशोर व्यवहारेची भारतीय संघात निवड तर तृप्ती पाराशर हिची मेक्सिको येथील आंतरराष्ट्रीय युथ स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदी निवड

Jun 7, 2022

जागतिक युथ स्पर्धेसाठी आकांक्षा किशोर व्यवहारे ची भारतीय संघात निवड व महाराष्ट्रातील पहिलीच वेटलिफ्टिंग ची आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर हिची पुन्हा एकदा मेक्सिको येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय युथ स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदी निवड
आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग संघटना आयोजित जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाड च्या खेळाडूंची पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप
मेक्सिको लिओन येथे 9 ते 20 जून दरम्यान होणाऱ्या जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी गुरू गोविंद सिंग हायस्कुल व जय भवानी व्यायामशाळेची गुणी खेळाडू आकांक्षा किशोर व्यवहारे हिची 40 किलो वजनी गटात भारतीय संघात निवड व महाराष्ट्रातील पहिलीच आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर हिची सलग दुसऱ्यांदा भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदी निवड करण्यात आली आहे
आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाच वेळी प्रशिक्षक व खेळाडू म्हणून दोघींची निवड झाल्याने मनमाड शहर तसेच नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंनी आनंद व्यक्त केला असून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी बजावण्यासाठी तृप्ती व आकांक्षा सिध्द झाल्या आहेत जय भवानी व्यायामशाळेच्या गुरू शिष्यांची जोडी मेक्सिको येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत निश्चितच उत्तम कामगिरी करतील
यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील,मोहन अण्णा गायकवाड,डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी,छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ,मुख्याध्यापक आर एन थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे,पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस श्री गुरुगोविंद सिंग हायस्कुलचे गुरुद्वारा मनमाड चे प्रमुख बाबा रणजित सिंगजी प्राचार्य सदाशिव सुतार सर यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
.