loader image
[ays_poll id=7]

नाशिक परिमंडळामध्ये सुरक्षा ठेवीच्या व्याजापोटी परतावा;८ लाख ७९ हजार लघुदाब वीजग्राहकांना ६ कोटी ६८ लाख रुपये जमा

Jun 9, 2022


वीज कायदा २००३ नुसार सुरक्षा ठेव भरणे वीज ग्राहकांसाठी बंधनकारक असून, ग्राहकांचा वार्षिक वीज वापर लक्षात घेऊन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. महावितरणकडे सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या रकमेवरील व्याजापोटी नाशिक परिमंडळा अंतर्गत नाशिक, मालेगाव व अहमदनगर मंडळातील लघुदाब वर्गवारीतील वीज ग्राहकांना सुरक्षा ठेवीवर ८ लाख ७९ हजार ५९२ ग्राहकांना व्याजाच्या रूपाने ६ कोटी ६८ लाख ३० हजार रुपयांचा रुपयांचा परतावा त्यांच्या मागील दोन महिन्यातील वीज बिलातून देण्यात आला आहे.

मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांनी महावितरणकडे सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक आहे. मा. आयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता २०२१ च्या विनिमय १३.१ नुसार वीजग्राहकांना सुरक्षा ठेव आकारण्यात येते. दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते व त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. याआधीची जमा असलेली सुरक्षा ठेव व वीजवापरानुसार नव्याने निर्धारीत करण्यात आलेली सुरक्षा ठेव यांच्यातील फरकाची रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात येते. यापूर्वी सुरक्षा ठेव सरासरी एका बिलाच्या रकमेइतकी होती. आता वीजग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिल असेल तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद मा. आयोगाकडून करण्यात आली आहे.
तसेच विनिमय १३.११ नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर आरबीआयच्या दराच्या सममूल्य दराने ग्राहकांना व्याजाची रक्कम वीजबिलाद्वारे समायोजित करून अदा करण्यात येते. त्याप्रमाणे सन २०२१-२२ मध्ये नाशिक परिमंडळा अंतर्गत नाशिक, मालेगाव व अहमदनगर मंडळातील लघुदाब वर्गवारीतील ८ लाख ७९ हजार ५९२ ग्राहकांना ६ कोटी ६८ लाख ३० हजार रुपयांच्या व्याजाचा परतावा मागील दोन महिन्यांच्या वीजबिलांच्या माध्यमातून समायोजित करण्यात आला आहे.
जमा असलेल्या सुरक्षा ठेवीवरील व्याजापोटी नाशिक मंडळा अंतर्गत चांदवड विभागातील ४६ हजार ६०२ ग्राहकांना २५ लाख १८ हजार, नाशिक ग्रामीण विभागातील ८२ हजार ४३४ ग्राहकांना ६२ लाख ५७ हजार, नाशिक शहर १ विभागातील १ लाख २० हजार ७७८ ग्राहकांना १ कोटी ४२ लाख ३२ हजार, नाशिक शहर २ विभागातील २ लाख ३१ हजार २९४ ग्राहकांना १ कोटी ५९ लाख २३ हजार रुपयांचा परतावा देण्यात आला आहे.

तसेच मालेगाव मंडळाअंतर्गत कळवण विभागातील २२ हजार ६१२ ग्राहकांना १० लाख ४९ हजार, मालेगाव विभागातील १६ हजार ४९६ ग्राहकांना ९ लाख ७० हजार, मनमाड विभागातील ३५ हजार ८२५ ग्राहकांना २१ लाख २६ हजार, सटाणा विभागातील १५ हजार ४६३ ग्राहकांना ७ लाख ६७ हजार रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. अशी एकूण नाशिक जिल्ह्यात ५ लाख ७१ हजार ५०२ ग्राहकांना ४ कोटी ३८ लाख ४१ हजार रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. या सोबतच अहमदनगर मंडळात ३ लाख ८ हजार ८८ ग्राहकांना २ कोटी २९ लाख ८८ हजार रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. गेल्या एप्रिलमध्ये नाशिक परिमंडळा अंतर्गत संबंधित वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात आले आहे. ही रक्कम भरण्यासाठी सहा मासिक हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुरक्षा ठेवीचे बिल भरून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.