चांदवड शहर व तालुक्यात अनेक भागात वादळी वारा ,गारपीट
नाशिक जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला असून काल मनमाड तर आज चांदवड शहर परिसर,तसेच गिरणारे या ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट आणि जोरदार पावसाने संध्याकाळच्या सुमारास हजेरी लावली,वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली तर काही ठिकाणी घरांची छत उडाली,पावसाचा जोर इतका होता की शहरातील अनेक भागातून नदीला पूर यावा आशा पद्धतीने पाणी वाहत होते जोरदार वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे,मनमाड पासून काही अंतरावर असलेल्या गिरणारे परिसरात पुन्हा जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने विशेषतः कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
नांदगाव शहर व परिसरातील रस्त्यांची त्वरीत दुरूस्ती करावी – संतोष गुप्ता
नांदगांव शहराच्या जुन्या रेल्वे गेट ते बेलदार वाडी प्रयन्त येवला रोड व तालुक्यातील काही भागातील...


