loader image
[ays_poll id=7]

विधानपरिषद निवडणूक चुरशीची होणार ; १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात

Jun 15, 2022

राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर भाजपच्या विजयी डावपेच सफल झाल्यानंतर विधान परिषदेसाठी समीकरण तापलं आहे. विधान परिषद बिनविरोध होणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे. अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी माघार घेतली आहे.
विधान परिषदेसाठी 20 जून रोजी होणार मतदान होणार आहे. विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार आहेत.

भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड रिंगणात आहेत. शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी निवडणुकीला उभे आहेत. राष्ट्रवादीने रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहेत. काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप रिंगणात आहेत.
भाजपकडे सध्या 106 जागांचं संख्याबळ असून काही अपक्ष आमदार त्यांच्यासोबत आहेत. विधानपरिषदेत प्रत्येक आमदाराला निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची 27 मते आवश्यक आहेत.

या गणितानुसार, भाजपचे पहिले 4 उमेदवार सहज निवडून येतील. तर पाचव्या जागेवरील प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी काही मतांची तजवीज करावी लागेल. चार जागांसाठी 108 मतांची गरज लागेल. त्यामुळे प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी आणखी 27 मतांची जुळवाजुळव भाजपला करावी लागणार आहे. पाचवी जागा जिंकण्यासाठी भाजपला 130 पेक्षा जास्त मतांची गरज लागेल. यामुळे भाजपला बरीच मेहनत करावी लागणार आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड - मनमाड डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी नवनिर्वाचीत आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे...

read more
भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

मनमाड शहरात भाजपा चे पाच हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट ❗विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या...

read more
मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांन चे प्रेरणा स्थान भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय...

read more
नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

मनमाड - नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या सभेत तालुकाध्यक्षपदी एबीपीमाझा, पुण्यनगरी,...

read more
.