loader image
[ays_poll id=7]

आता मतदार ओळखपत्र देखील आधाकार्डशी लिंक करावे लागणार

Jun 18, 2022

केंद्र सरकारने मतदार ओळखपत्राला आधार लिंक करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. पॅनकार्डसोबत आधार लिंक करणे अनेक दिवसांपासून सरकार सांगत असून आता मतदार ओळखपत्राशीही आधार लिंक करणं आवश्यक असणार आहे याबाबत सरकारने शुक्रवारी चार अधिसूचना जारी केली असल्याचे कळते.

मतदार यादीशी आधार लिंक करणे, सेवा मतदारांसाठी मतदार यादी लिंग-सुसंगत करणे याशिवाय तरुण मतदारांना वर्षातून एकऐवजी चार वेळा मतदार यादीत नाव नोंदवण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय निवडणूक प्रक्रियेतील बोगस मतदानाला आळा बसू शकतो.

देशातील नागरीकांच्या मतदार यादीचा डेटा आधार इकोसिस्टमशी जोडला की, एकच व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी एकापेक्षा जास्त मतदार ओळखपत्रे वापरू शकणार नाही. यामुळे एकाहून अधिक ठिकाणी मतदार यादीत नाव नोंदवण्यापासून रोखले जाईल. मतदार यादीला आधार लिंक केल्यामुळे एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या नाव नोंदणीचे गैरप्रकार रोखता येतील, असे सरकारचे म्हणणे आहे.
18 वर्षे पूर्ण होणारे तरुण मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी तात्काळ अर्ज करू शकतात. यापूर्वी वर्षातून एकदाच ही सुविधा मिळायची. आता वर्षातून चार वेळा नाव नोंदणी करण्यासाठी वेळ दिला जाणार आहे.

सेवा मतदारांचा विचार करून निवडणूक कायद्यात त्यांच्या सोईच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. सैनिकांसारखे सेवा मतदार हे निवडणूक काळात दूर अंतरावर असतील किंवा किंवा परदेशात भारतीय मिशनचे सदस्य हे सेवा मतदार म्हणून गणले जाणार आहेत. याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे लिंगभाव विषमता काढून टाकण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याने “पत्नी” हा शब्द “जोडीदार” या शब्दाने बदलला जाईल ज्यामुळे लिंगभाव विषमता नष्ट होण्याचा प्रयत्न आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा...

read more
मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवा तील प्रथम मानाचा गणपती म्हणून...

read more
श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

  नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र...

read more
बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

या गणेशोत्सवात लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने दहा दिवस सर्वत्र प्रसन्नमय वातावरण झाले. बाप्पाच्या...

read more
बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
.