Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

शिवसेना ५६ वा वर्धापनदिन शिवसेना मनमाड शहराच्यावतीने जल्लोषात साजरा

Jun 19, 2022

शिवसेना मनमाड शहर शाखेच्यावतीने शिवसेना ५६ व्या वर्धापनदिन विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात शिवसेना आमदार मा. सुहासआण्णा कांदे संपर्क कार्यालय मालेगाव चौफुली येथे सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, शिवसेनाप्रमुख सरसेनापती स्व. बाळासाहेब ठाकरे व माँसाहेब स्व. मीनाताई ठाकरे आदीं प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अल्ताफ खान, शहरप्रमुख मयूर बोरसे, नगरसेवक कैलास गवळी, साईनाथ गिडगे, विनय आहेर, लियाकत शेख, संजय कटारिया, सरलाताई घोगले, सौ पूजा छाजेड आदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी एकमेकांना लाडू भरवून आनंदोत्सव साजरा केला. तसेच गोरगरिबांना शिवभोजन (अन्नदान) शिवसेना उपशहरप्रमुख जाफर मिर्झा, छोटू धाकराव, परेश राऊत, दिनेश केकाण, सुभाष माळवतकर, युवासेनेचे योगेश इमले, शहरप्रमुख अमीन पटेल,अंकुश गवळी, सचिन दरगुडे, राहील मन्सूरी, सिद्धार्थ छाजेड, निलेश ताठे, हर्षल भाबड आदींच्या हस्ते करण्यात आले तसेच ग्रामीण उपजिल्हारुग्णाल येथील रुग्णांना फळ व बिस्कीट उपशहरप्रमुख दिनेश घुगे, महेंद्र गरुड, पिंटू वाघ, डॉ विनोद ठाकरे, कयाम सय्यद आदींच्या हस्ते देण्यात आले,
वरील सर्व कार्यक्रमांना बाळासाहेब माळवतकर, कासीफ शेख, गणेश सांगळे, विक्की सुरवसे, ललित रसाळ, चेतन उल्हाळे, नितीन कदम, किशोर कदम, नंदू पिठे, किशोर गोसावी आदीं शिवसैनिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वरील सर्व कार्यक्रमांचे आयोजन शहरप्रमुख मयूर बोरसे, सूत्रसंचालन उपशहरप्रमुख जाफर मिर्झा यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]