Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव शिवसेना महिला आघाडीतर्फे आज जागतिक योग दिनानिमित्त योग दिवस साजरा करण्यात आला.

Jun 21, 2022



शिवसेना महिला आघाडीतर्फे नांदगाव शहरातील महिलांना या निमित्ताने योगाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. दैनंदिन जीवनात विविध आजारांपासून पासून आपण स्वतःला दूर कसे ठेवू शकतो आणि यासाठी योगाचे महत्व काय ते योग्य प्रशिक्षकांनी उपस्थित मुलांना समजावून सांगितले.
सदर कार्यक्रम शिवनेरी शासकीय विश्राम गृहाच्या प्रणांगणात घेण्यात आला. शिवसेना महिला आघाडीच्या शहर प्रमुख सौ.रोहिणी मोरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. याप्रसंगी योग प्रशिक्षक सौ. पुनम आहेर यांनी उपस्थित महिलांना योगाचे महत्व सांगितले, तसेच योग प्रात्यक्षिके करवू न घेतली. योग प्रशिक्षक सौ संगीता सोना सौ अर्चना बोरसे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती बोरसे यांनी केले तसेच आभार रोहिणी मोरे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी मोठ्या संख्येने नांदगाव शहरातील महिला या कार्यक्रमास उपस्थित होत्या.

अजून बातम्या वाचा..

लासलगांव स्टेशनवरील किसानसेवा रेल्वेच्या पार्सल व्हॅन (व्हीपी) ची संख्या वाढवा – ना.डॉ.भारती पवार

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना.डॉ.भारती पवार यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे...

read more

चांदवड तंत्रनिकेतनमध्ये असिस्टंट इलेक्ट्रिशन कोर्स उत्तीर्ण लाभार्थ्याना प्रमाणपत्राचे वितरण

श्री एचएचजेबी तंत्रनिकेतमध्ये प्राधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत असिस्टंट इलेक्ट्रिशन...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]