loader image
[ays_poll id=7]

अंकाई किल्ला – मनमाड स्थानकादरम्यान नॉन इंटरलॉकिंग चे काम प्रगतीपथावर : अनेक रेल्वे गाड्या रद्द

Jun 25, 2022


भुसावळ रेल्वे विभागात अंकाई किल्ला-मनमाड स्थानकादरम्यान नॉन इंटरलॉकिंगचे काम रेल्वे विभागाकडून प्रगतीपथावर असून ह्या कामामुळे सदरील रेल्वे मार्गावर अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. २४ ते २९ जूनदरम्यान विविध रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात पुणे स्थानकावरून जाणाऱ्या व येणाऱ्या १५ रेल्वेचा समावेश आहे.

पुणे-जसीडिह एक्स्प्रेस, पुणे-काजीपेट एक्स्प्रेस (२४ जून), पुणे-अजनी एक्स्प्रेस (२५ जून), हडपसर-नांदेड एक्स्प्रेस, पुणे-नागपूर एक्स्प्रेस, पुणे-दरभंगा एक्स्प्रेस (२७ जून), पुणे-नागपूर एक्स्प्रेस (२८ जून) या गाड्या रद्द केल्या आहेत.

पुण्याला येणाऱ्या गाड्या

२४ ते २७ जून दरम्यान निजामाबाद येथून सुटणारी गाड्या. यात निजामाबाद-पुणे एक्स्प्रेस, अजनी-पुणे एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस, नांदेड-हडपसर एक्स्प्रेस, जसीडिह-पुणे एक्स्प्रेस, काजीपेट-पुणे एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस तर २९ जूनला दरभंगा-पुणे आदी रेल्वे रद्द केल्या आहेत.

या गाड्या उशिराने धावणार

२५ जून रोजी वास्को-द-गामा-हजरत निजामुद्दीन अंकाई रेल्वे स्थानकावरून १ तास उशिराने धावतील.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

मनमाड – मनमाड हून मुंबई येथे रोज जाणारी पंचवटी एक्सप्रेस ही कसारा स्टेशन जवळ कपलिंग तुटल्याने...

read more
नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव : मारुती जगधने तालुक्यातील लोढरे शिवारात बिबट्याने नागरीकाना दर्शन दिल्याने नागरीक...

read more
.