loader image
[ays_poll id=7]

आ.सुहास कांदे रहेनुमा फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व गरीब विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

Jun 27, 2022




नांदगाव शहरातील आ. सुहास कांदे रहेनुमा फाउडेंशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार संभारभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमात नांदगांव शहरातील सर्वच शाळांतील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रक व स्मृतचिन्ह देवून सन्मानित करण्यात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक इकबाल दादा शेख हे होते
कार्यक्रमात सर्वच शाळांतील गुणवंत विद्यार्थी पालक आवर्जून उपस्थित होते. सूत्रसंचालन एच.आर. हायस्कूलचे मुख्याध्यापक सईद सर यांनी केले मुफ्ती फहीम साहेब यांनी आपल्या उत्कृष्ट शैलीत भाषण वजा प्रवचन देवून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, आजचा विध्यार्थी फेसबुक व्हॉट्सॲप च्या आहारी जाऊन अभ्यासा पासून कसा दुरावत चालला आहे, पालकांनी मुलांकडे किती व कसे लक्ष दिले पाहिजे , चागले शिक्षण कसे घ्यावेत, शिक्षणाचे महत्त्व आजचा विध्यार्थी इत्यादींवर प्रबोधनपर भाषण देवून उपस्थितांचे मन मोहून घेतले, कार्यक्रमाचे अध्यक्ष इकबाल दादा शेख यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत आयोजकांचे मनपूर्वक आभार मानले डॉक्टर गणेश चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त करतांना फाउंडेशन च्या कार्याची स्तुती केली सर्वात शेवटी रियाज पठाण सर यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे अध्यक्ष सईद शेख सचिव आयाज शेख, नईम शेख, वसीम खान, अक्रम मोमिन इकबाल शेख, रमीज कुरैशी,अमजद पठाण, इम्तियाज गांधी, मुफ्ती फहीम साहेब यांनी उत्कृष्ट नियोजन करत मेहनत घेतली


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.