Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

(बघा व्हिडीओ) मनमाड येथील करुणा हौस्पिटल येथे ‘राष्ट्रीय डॉक्टर दिन’ साजरा

Jul 1, 2022

मनमाड (योगेश म्हस्के) : दैनंदिन जीवनात मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त राहण्यासाठी डॉक्टरांकडून अनेक सल्ले दिले जातात. कोरोना महामारीच्या काळात तर डॉक्टर आपल्यासाठी देवदूतच ठरले होते. स्वतःचा जीव धोक्यात घालून आणि प्रतिकूल परिस्थितीत आपल्या रुग्णाचा जीव कसा वाचविण्याचा प्रयत्न करतो हे सर्वांनी पाहिले. प्रत्येक डॉक्टर आपल्या रुग्णांना सर्वोत्तम आरोग्यसेवा पुरवतो याची खात्री करतो. इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे दरवर्षी 1 जुलै रोजी 'राष्ट्रीय डॉक्टर दिन' साजरा केला जातो. भारताचे प्रसिद्ध चिकित्सक डॉ. विधान चंद्र रॉय यांना श्रद्धांजली आणि सन्मानार्थ 1 जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. डॉक्टरला देवाचं रूप मानलं जातं. अनेक रूग्णांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी डॉक्टर हा त्यांच्या आयुष्यात आलेला देवदूत असते. अमूल्य सेवेसाठी डॉक्टरांचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

याच दिनानिमित्त मनमाड येथील करुणा हौस्पिटल येथे राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्यात आला , हौस्पिटल मधील सर्व डॉक्टर ,नर्स आणि सर्व कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.शहरातील कांचनसुधा स्कुलच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर आणि नर्स यांची वेशभूषा सादर करून तर काही विद्यार्थ्यांनी डॉक्टरांप्रती आपले विचार मांडुन करुणा हौस्पिटल येथे ‘राष्ट्रीय डॉक्टर दिन’ साजरा केला , यावेळी हौस्पिटलच्या वतीने विद्यार्थ्यांचे चॉकलेट देऊन स्वागत देखील करण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरात भाजपा च्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 197 वी जयंती साजरी

मनमाड शहरात भाजपा च्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 197 वी जयंती साजरी

मनमाड - भाजपा मनमाड शहर मंडला च्या वतीने क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 197 व्या...

read more
नांदगाव बाजार समिती सचिवाचीं बोलठाण येथील व्यापारी  बांधवाना दमबाजी. प्रहार शेतकरी संघटनेचे संदिप सुर्यवंशी यांनी केला जाहीर निषेध

नांदगाव बाजार समिती सचिवाचीं बोलठाण येथील व्यापारी  बांधवाना दमबाजी. प्रहार शेतकरी संघटनेचे संदिप सुर्यवंशी यांनी केला जाहीर निषेध

नांदगाव  सोमनाथ घोंगाणे नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील व्यापारी बांधवाना नांदगाव बाजार...

read more
फलक रेखाटन फलक रेखाटनातून आपणा सर्वांना गुढीपाडवा सणाच्या , मराठी नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा !

फलक रेखाटन फलक रेखाटनातून आपणा सर्वांना गुढीपाडवा सणाच्या , मराठी नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा !

  फलक रेखाटन - देव हिरे.(कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव....

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]