loader image
[ays_poll id=7]

पत्रकार निलेश वाघ यांना कै. दादाजी राजाराम हिरे स्मृती कर्मयोगी पुरस्कार शेती व हवामान तज्ञ श्री पंजाबराव डख यांच्या हस्ते प्रदान

Jul 3, 2022


मनमाड (प्रतिनिधी) : झी २४ तास वृत्तवाहिनीच्या नाशिक जिल्हा ग्रामीणचे प्रतिनिधी पत्रकार निलेश वाघ यांना कै. दादाजी राजाराम हिरे स्मृती कर्मयोगी पुरस्कार शेती व हवामान तज्ञ श्री पंजाबराव डख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आघार बुद्रुक येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला

मालेगाव तालुक्यातील आघार बुद्रुक येथील कै. दादाजी राजाराम हिरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिन कार्यक्रमात कर्मयोगी स्मृती पुरस्कार देण्यात आला वृत्तवाहिनी वार्तांकन क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या पत्रकाराला तसेच विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारासाठी, पुरस्कार निवड समितीने झी २४ तास वृत्तवाहिनीसाठी नाशिक जिल्हा ग्रामीणचे प्रतिनिधी म्हणून काम पाहणारे पत्रकार निलेश वाघ यांची निवड केली होती. कै. दादाजी राजाराम हिरे यांचे निधन झाले असून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी इतर मान्यवरासोबत पत्रकाराला देखील हा स्मृती पुरस्कार दिला गेला. कै. दादाजी राजाराम हिरे यांच्या आज आघार बुद्रुक येथे झालेल्या प्रथम पुण्यस्मरणदिनी
शेती व हवामान तज्ञ श्री पंजाबराव डख यांच्या हस्ते व
मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. इतरांना मदत केल्या शिवाय आपण स्वतःला मदत करू शकत नाही, इतरांना समृध्द केल्या शिवाय आपलं आयुष्यात समृध्द होऊ शकत नाही, इतरांची भरभराट केल्याशिवाय आपली स्वतः ची भरभराट होत नाही.” हिच धारणा मनात ठेवून दुसऱ्याबद्दलची आपुलकी आपल्या शब्दां शब्दांतुन जाणवते व आपण आपल्या क्षेत्रात उल्लेखणीय कामगिरी करीत समाजाप्रती आपले कर्तव्य निस्वार्थपणे करीत आहात. आपले कार्य युवकांना, नवं पत्रकारांना प्रेरणादायी आहे. आपल्या कार्याची दखल घेत आपणांस कर्मयोगी पुरस्कारासाठी प्रदान करण्यात येत असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक तथा रामराज्य ग्रुपचे संस्थापक श्री रामचंद्र हिरे सांगितले पत्रकार निलेश वाघ यांच्यासह बारा बलुतेदार संघटनेचे बंडूकाका बच्छाव, माजी कृषी मंत्री दादा भुसे यांच्या पत्नी अनिता भुसे, जिल्हा परिषद सदस्य समाधान हिरे आदींना पुरस्कार प्रदान करण्यात आला

फोटो
मनमाड : झी २४ तास वृत्तवाहिनीच्या नाशिक जिल्हा ग्रामीणचे प्रतिनिधी पत्रकार निलेश वाघ यांना कै. दादाजी राजाराम हिरे स्मृती कर्मयोगी पुरस्कार प्रदान करतांना शेती व हवामान तज्ञ श्री पंजाबराव डख, रामराज्य ग्रुपचे संस्थापक श्री रामचंद्र हिरे आदी


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.