loader image
[ays_poll id=7]

महाराष्ट्रातील नागरिकांना स्वस्त दरात पेट्रोल-डिझेल देणार ;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Jul 4, 2022

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची, तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली व आज विधानसभेत भाजप व शिंदे गटाने बहुमताने विश्वासदर्शक ठराव जिंकला.

विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देणार असल्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे.
महाराष्ट्र सरकार लवकरच पेट्रोल-डिझेलवरील ‘व्हॅट’मध्ये कपात करणार असून लवकरच यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल असे ह्या वेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. महाराष्ट्रातील नागरिकांना स्वस्त दरात पेट्रोल-डिझेल देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

मोदी सरकारने गेल्या दिवाळीत पेट्रोल-डिझेलवरील अबकारी करात मोठ्या प्रमाणात कपात केली होती. त्यानंतर अनेक राज्यांनीही कर कपात केली.. त्यामुळे त्या राज्यांमध्ये 15 ते 20 रुपयांनी इंधनाचे दर कमी झाले होते. मात्र, ठाकरे सरकारने पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करणार नसल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले होते.

केंद्र सरकारने पुन्हा 2 महिन्यांपूर्वी अबकारी कर कमी केला. मात्र, त्यावेळीही ठाकरे सरकारने कर कपात करण्यास नकार दिला होता. कोविडबाबत झालेल्या आढावा बैठकीत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राज्यांना कर कमी करण्याची सूचना केली होती. त्यावर केंद्राने आम्हाला ‘जीएसटी’ परतावा दिलेला नाही, असं सांगून ठाकरे सरकारने कर कपात फेटाळली होती.

ठाकरे सरकार कोसळल्यानंतर सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिलाच निर्णय इंधनाबाबत घेतला. लवकरच महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेलवरील करात कपात केली जाणार असून, राज्यातील नागरिकांना स्वस्त दरात इंधन मिळणार असल्याचे शिंदे यांनी घोषित केले. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा...

read more
मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवा तील प्रथम मानाचा गणपती म्हणून...

read more
श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

  नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र...

read more
बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

या गणेशोत्सवात लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने दहा दिवस सर्वत्र प्रसन्नमय वातावरण झाले. बाप्पाच्या...

read more
बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
.