मेष: या राशीतील व्यक्तींनी आज प्रेमप्रकरणी चुका होणार नाही याची दक्षता घ्या. घरातील मंडळींचे आदेश पाळा. ताणतणाव कमी करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या.
वृषभ : दिवस आनंदात जाईल. कौटुंबिक जीवनशैलीत सुख मिळेल. कामात यश मिळेल. खर्चावर लक्ष ठेवणं गरजेचे आहे.
मिथुन : मित्रपरिवारांसोबत वेळ घालवाल. मन अस्थिर असेल. खर्च वाढेल. कामात अडथळे येतील. मित्रांच्या मदतीने रखडलेले काम मार्गी लागेल.
कर्क : आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. वाईट विचार तुमच्या मनासाठी घातक ठरू शकतात, त्यामुळे संयम ठेवा. आर्थिक स्थिती ढासळेल. रात्रीच्या मध्यान्हानंतर शारीरिक रुपातून मनात प्रसन्नता राहिल. धन लाभ होईल आणि कामा-धंद्यात यश मिळेल. मित्रपरिवारांसोबत आपला दिवस चांगला जाईल.
सिंह : धन लाभ होईल. शुभवार्ता मिळेल. मानसिक संतुलनात स्थिरता राहील. प्रत्येक कामात यशप्राप्ती होईल. कुटुंबात आनंदमय वातावरण राहील. धावपळीच्या जीवनात मान-सन्मान मिळेल.
कन्या : कुटुंबातील वातावरण आनंदमय असेल. घरात स्वच्छता ठेवल्यामुळे मन प्रसन्न होईल. कामातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आर्थिक लाभ होईल. आरोग्य चांगले राहील. मनात शांती ठेवा, त्यामुळे तुम्हांला स्फूर्ती मिळेल.
तुळ: तुळ राशीतील व्यक्तींनी खाण्यावर नियंत्रण ठेवा. तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करा. घरातील मंडळींचे विचार पटणार नाहीत. परंतु त्या विचारांचे पालन करुन योग्य ती कृती करा. मित्र मंडळीची गाठभेट होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक: या राशीच्या व्यक्तींना आज कंबर दुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे झाल्यास दुर्लश्र करु नका. तसेच आजच्या दिवशी आराम केल्यास उत्तम. अचानक खर्च वाढू शकतो. घरात थोडे वादाचे वातावरण तयार होईल.
धनु: धनु राशीतील व्यक्तींचा आजचा दिवस उत्साहात जाईल. मित्र परिवारासह बाहेर जाण्यास वेळ काढा. कामे करताना घाईने निर्णय घेऊ नका. आई-वडिलांची साथ लाभेल.
मकर: आजचा दिवस मकर राशीतील व्यक्तींशी उत्तम असणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी कळेल.घरातील मंडळींशी आदराने वागा.शुभ उपाय- पक्षांना अन्नदान करा.
कुंभ: आज तुम्हाला डोक शांत ठेवून विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवसायात पैशांचे व्यवहार जपून करा. घरातील वयोवृद्धांचा मान राखा. थोडा अश्यकतपणा वाटेल पण आराम केल्यास उत्साहित वाटेल.
मीन: आजच्या दिवशी मीन राशीतील व्यक्तींसाठी आजचा दिवसाची सुरुवात उत्तम होणार नाही. परंतु काळजीपूर्वक कामे केल्यास चुका होण्याची शक्यता टळेल. आई-वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.




