loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्यात भुजबळ पुन्हा सक्रिय

Jul 13, 2022

नांदगाव : शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी शिंदे गटाला आपला पाठिंबा व्यक्त केल्यानंतर मतदारसंघात शिवसेनेने शक्तीप्रदर्शन केले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. मतदारसंघातील पालिकांसह विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून भविष्यातील सत्ता ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन पक्षाचे विधानसभा अध्यक्ष विनोद शेलार यांनी केले आहे. माजी
पालकमंत्री छगन भुजबळ आणि आमदार कांदे यांच्यातील जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा तसेच राजकीय वाद सर्वश्रृत आहे.आता त्यांनी कांदे यांनी शिंदे गटाची पाठराखण केल्याने राष्ट्रवादी पुन्हा कामाला लागली आहे.
माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या बैठकित पालिका निवडणुकीबाबत विचारविनिमय झाला. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या आवाहनाला तालुका पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकदिलाने साद घालून काम करावे, असे आवाहनही तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी केले.

बैठकीला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाळकाका कलंत्री, माजी नगराध्यक्ष काका सोळसे, माजी उपनगराध्यक्ष शिवाजीराव पाटील, वाल्मीक जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोपान पवार, शहराध्यक्ष गौतम जगताप, सुनंदा खैरनार, राजू लाठे, प्रसाद सोनवणे, दीपक खैरनार, अशोक पाटील, समता परिषदचे शहराध्यक्ष शिवा सोनवणे, महेश पवार, सचिन देवकाते, दत्तू पवार, तानसेन जगताप, दया जुन्नरे, डॉ. सुरेश गायकवाड, सुरेश गायकवाड, अबिद सय्यद, मंगेश पगारे, बाळासाहेब देहाडराय, विश्वास आहिरे, राहुल आहेर आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
.