Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

एशियन युथ ज्युनिअर सीनिअर वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप स्पर्धा : आकांक्षा व्यवहारे भारतीय संघात तर प्रशिक्षकपदी तृप्ती पाराशर

Jul 13, 2022

मनमाड च्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा
ताशकंद उझबेकिंस्थान येथे होणाऱ्या एशियन युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील पहिली आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर हिची सलग तिसऱ्यांदा व जागतिक युथ स्पर्धेतील रौप्यपदक विजेती आकांक्षा किशोर व्यवहारे हिची सलग दुसऱ्यांदा भारतीय संघात निवड
ताशकंद उझबेकिंस्थान येथे होणाऱ्या एशियन युथ ज्युनिअर सिनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षक म्हणून महाराष्ट्रातील पहिली आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर हिची सलग तिसऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय वेटलिफ्टिंग संघाची प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे
40 किलो वजनी गटातील जागतिक युथ स्पर्धेतील रौप्यपदक विजेती व मनमाड च्या जयभवानी व्यायामशाळा व श्री गुरू गोविंद सिंग हायस्कुलची विद्यार्थिनी आकांक्षा किशोर व्यवहारे हिची सुद्धा सलग दुसऱ्यांदा उझबेकिंस्थान येथे होणाऱ्या एशियन युथ वेटलिफ्टिंग या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे उझबेकिंस्थान मधील ताशकंद शहरात 15 ते 26 जुलै 2022 दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
मनमाड सारख्या छोट्या शहरातून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रशिक्षक तृप्ती व आकांक्षा ने नाशिक जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक वाढविला आहे
यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील,मोहन अण्णा गायकवाड,डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी,छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ,मुख्याध्यापक आर एन थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे,पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस, महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष संजय मिसर,सचिव प्रमोद चोळकर,भारतीय व महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघाचे उपाध्यक्ष संतोष सिंहासने, गुरू गोविंद सिंग हायस्कुल चे अध्यक्ष बाबा रणजित सिंग प्राचार्य सदाशिव सुतार यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]