मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात शनिवार दिनांक 16/07/ 2022 रोजी संकष्ट चतुर्थी (आषाढ कृष्ण चतुर्थी) निमित्त सकाळी श्री निलमणीस सकाळी 6 वाजता महाभिषेक महापूजा,तर रात्री 10-00 वाजता{ चंद्रोदय :रात्री 09 वाजून 50 मिनिटे} महाआरती कार्यक्रमाचे आयोजन श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट मनमाड तर्फे करण्यात आले आहे मनमाड शहर व परिसरातील सर्व गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने या धार्मिक कार्यक्रमाना उपस्थित रहावे असे आवाहन ट्रस्ट तर्फे विश्वस्त मंडळा ने केले आहे महाअभिषेक आणि महाआरती चे वेळी सामूहिक श्री गणपती अथर्वशीर्ष पठण संपन्न होणार आहे..
प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अंकाई किल्ल्यावर मनमाड च्या गिरी प्रेमींनी दुर्ग पूजन व ध्वजारोहण करत साजरा केला मूर्ती प्रतिष्ठापना क्षण
प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अगस्ती ऋषींचा वास्तव्य असलेल्या किल्ले अंकाई...











