नांदगाव( प्रतिनिधी) – नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी शुक्रवारी नांदगाव दौरा केला. नांदगाव येथे तालुकास्तरीय आढावा बैठकीत ग्रामसेवक व सरपंच यांच्याशी संवाद साधताना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सांगितले की, कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही गावाला दुषित पाण्याचा पुरवठा होता कामा नये, टीसीएल चा वापर योग्य प्रमाणात व नियमितपणे करावा, मुदतबाह्य टीसीएल चा वापर होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना दिल्या. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, गट विकास अधिकारी गणेश चौधरी उपस्थित होते.
राज्यातील सुमारे २६५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर
पावसाळ्यातील यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच मान्सूनने ओढ दिल्याने राज्यातील काही भागांसह नांदगाव...











