Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाडला केंद्र शासनाच्या धोरणाचा निषेध

Jul 16, 2022

अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर केंद्र शासनाकडून 5% जीएसटी लागू होणार असल्याबाबतचा अंतिम निर्णय जीएसटी कौन्सिलमध्ये घेतल्याचे समजते आहे. सदरबाबतचे नोटीफिकेशन दि. 13 जुलै 2022 रोजी काढलेला आहे. केंद्र सरकारने अन्नधान्य, खाद्यान्न व जीवनावश्यक वस्तूंवर 5% जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकरी, छोटे व्यापारी आणि पर्यायाने सामान्य जनतेला बसणार आहे. त्यामुळे महागाई अजूनच वाढून सर्वसामान्य जनता यात भरडली जाणार आहे.
जी.एस.टी. मध्ये अन्नधान्य, गुळ, कडधान्य या वस्तूंचा समावेश केला आहे. सदर जीएसटी दि. 18 जुलै 2022 पासून लागू होणार आहे. याबाबत चेंबर ऑफ कॉमर्स ने देशव्यापी बंद शनिवार दि. 16 जुलै 2022 रोजी पुकारण्यात आला होता । त्यामध्ये मनमाड येथिल किराणा व्यापारी असोसिएशन, अन्न धान्य व्यापारी हे सहभागी झाले ।
या निर्णयाचा मनमाड किराणा असोसिएशन वतीने जाहीर निषेध करण्यात आले .
केंद्र सरकारने हा अन्यायकारक व मॉल संस्कृती च्या हितासाठी घेतलेला निर्णय त्वरीत कायस्वरूपी रद्द करावा ही मागणी केली. मोर्च्यात किराणा असोसिएशन चे अध्यक्ष दिपकभाऊ मुनोत ,उपाध्यक्ष किरण देव ,सचिव अनुप बेदमुथा ,सहखजिनदार संतोष नहार ,मार्गदर्शक कैलास बेदमुथा ,अनिल लोढा ,दिनेश बेदमुथा ,अमोल मुथा ,पंकज पाटणी ,भरत छाबडा, महेश नावरकर , विनोद सांगळे ,दिलीप लुनावत , रामुभाऊ जैन ,भूषण लुनावत, अभय नाईक ,राजू रुपारेल , शैलेश ब
बाकलीवाल ,अभय हिरण ,पारस आचलिया , कांतीलाल मेंगाने ,सोमनाथ मेंगाने ,पंकज लोढा ,जगु लुनावत ,संतोष जगदाळे ,सोनू लुनावत , मनोज लुनावत ,ओमसिंग राठोड आदी सर्व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.   

अजून बातम्या वाचा..

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]