नांदगाव (सोमनाथ घोंगाणे): नांदगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथील शेतकरी समाधान दिनकर काकळीज या शेतकऱ्याची तीन एकर मका बी ए एस एफ (B A S F) या कंपनीच्या टिन्झर हे तणनाशक फवारल्याने करपून पिवळी पडली.
याबाबत वृत असे की तालुक्यातील तांदुळवाडी येथील समाधान दिनकर काकळीज या शेतकऱ्याने नांदगाव येथील शिवधन अँग्रो या आस्थापने तून बी ए एस एफ (B A S F) या कंपनीचे टिन्झर हे तणनाशक लॉट नंबर D t. २२१०१४ हे दिनांक १०/७/ २२ रोजी ४२०० रूपयाचे घेतले . ते मका या पिकावर फवारले असता तीन एकर मधील मका पिवळी पडली तर काही मका करपून गेली. तरी याची त्वरीत चौकशी करावी अशी मागणी सदर शेतकरी यांनी कृषी अधिकारी जगदीश पाटील यांचेकडे केली आहे.
सागर जाधव यांचा शहर शिवसेनेतर्फे सत्कार
MPSC परीक्षेत भारतात 47 क्रमांकावर उत्तीर्ण झालेल्या श्री सागर साहेबराव जाधव रा.वडगांव याचा मनमाड...











