Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली नवीन कार्यकारीणी : शिंदे गट आणि शिवसेनेत पुन्हा जुंपणार

Jul 18, 2022

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला असून एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची जुनी कार्यकारणी बरखास्त करून नवीन कार्यकारणी जाहीर केली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. तर, दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे गटाने शिवसेना पक्षप्रमुखपदाला मात्र हात लावलेला नाही. एकनाथ शिंदे गटाने घेतलेला हा निर्णय म्हणजे मूळ शिवसेना आमचीच असल्याचा दावा मजबूत करण्यासाठी ही कार्यकारणी घोषित करण्यात आली असल्याची चर्चा सुरू आहे.

शिंदे गटाने शिवसेनेची नवीन कार्यकारणी जाहीर करताना नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड केली आहे. या दोघांचीही काही तासांपूर्वीच शिवसेनेतून पक्षविरोधी कारवाई केल्याच्या कारणाखाली हकालपट्टी करण्यात आली होती. शिंदे गटाने उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

अजून बातम्या वाचा..

मागासवर्गीय रेल्वे कामगार वर्धापनदिननिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

मागासवर्गीय रेल्वे कामगार वर्धापनदिननिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मनमाड येथे १२,१३फेब्रुवारी १९३८ रोजी भव्य मागासवर्गीय रेल्वे कामगार...

read more
कर्नाटक येथील घटनेचा मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने निवेदनद्वारे निषेध व न्यायालयीन चौकशीची मागणी

कर्नाटक येथील घटनेचा मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने निवेदनद्वारे निषेध व न्यायालयीन चौकशीची मागणी

मनमाड शहर शिवसेनेतर्फे भारताचे महामहीम राष्ट्रपती यांना एक निवेदन देण्यात आले त्याद्वारे कर्नाटक...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]