loader image
[ays_poll id=7]

पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार ; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा निर्धार

Jul 18, 2022


आज शिवसेनेच्या मुखपत्रात नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या घोषित झाल्यानंतर नांदगाव शहरात सायंकाळी सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांनी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केले. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्धार यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखविला. नांदगाव येथील शिवस्फुर्ती मैदानावरील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याला ही या वेळी पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी नवनियुक्त जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, सहसंपर्कप्रमुख प्रवीण नाईक, उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद,तालुकाप्रमुख संतोष अण्णा गुप्ता, उपतालुकाप्रमुख शशिकांत मोरे, मनमाड शहर प्रमुख मयूर बोरसे, माजी नगराध्यक्ष दिलीप सोळसे,सुनील पाटील, संजय कटारिया, विजय मिश्रा, ॲड.सुधाकर मोरे,लियाकत शेख,अशोक पदमर,राजाभाऊ आहेर,सनी फसाटे,शैलेश सोनवणे, प्रवीण सूर्यवंशी,कैलास भाबड, गोटू हिरण, कचरू आव्हाड, यांसह निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.