loader image
[ays_poll id=7]

येणाऱ्या काळात निर्बंधमुक्त उत्सवांची मांदियाळी

Jul 21, 2022

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या साथीमुळे राज्यातील दहीहंडी, गणेशोत्सव, मोहरम यांसारखे सण मोठ्या प्रमाणावर साजरे करण्यास मर्यादा आल्या होत्या. पण आता हे सर्व सण निर्बंधमुक्त साजरे करता येणार आहेत. पण या सणांबाबत हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे जे आदेश आहेत त्याचं पालन मात्र करणं गरजेचे आहे, असे निर्देश मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह इथं या सार्वजनिक उत्सवांसंदर्भात विविध समन्वय समित्यांसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

या बैठकीत झालेले निर्णय आणि प्रशासनाला दिलेले निर्देश –

१) उत्सव मार्गांवरील खड्डे दुरुस्तीचे आदेश

२) मंडप, इतर परवानग्यांसाठी एक खिडकी योजना, ऑनलाईन परवानग्या. क्लिष्ट अटीशर्ती, शुल्क नसणार.

३) कोविडकाळात आणलेली गणेशमूर्तींच्या उंचीवर मर्यादा हटवली.

४) सामाजिक बांधिलकी, नियमांचे पालन करण्यास प्राधान्य दिलं पाहिजे. नियमांबाबत बागुलबुवा नको.

५) मुंबईतल्या नियमावलींप्रमाणंच राज्यातही नियम असतील.

६) विसर्जन घाट, मिरवणूक मार्गांवरील लाईटच्या व्यवस्था होतील.

७) मूर्तीकारांच्या मागणीनुसार मूर्ती बनवण्यासाठी जागा देण्यात येणार

८) धर्मादाय आयुक्तांकडील नोंदण्या ऑनलाईन होणार

९) ध्वनीप्रदुषणाबाबत दाखल गुन्ह्यांचा तपास करुन किरकोळ गुन्हे हटवणार

१०) हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाच्या नियमांचे पालन करणं आवश्यक

अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.