loader image
[ays_poll id=7]

पावसात व पुरात सुरळीत वीजपुरवठा करणाऱ्या जनमित्रांचा केला गौरव

Jul 22, 2022


नाशिक : महावितरणच्या सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांना सर्वोत्कृष्ठ व अखंडित वीज सेवा देणे हे आपले आद्य कर्तव्य असून प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आपण कार्यरत असून यासोबतच थकबाकीदार ग्राहकांकडून वीज देयकांची थकबाकी वेळेत वसूल करणे सुद्धा अत्यावश्यक असून अन्यथा थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा नियमानुसार खंडित करा. वीज देयक थकबाकी वसुलीमध्ये व ग्राहक सेवेत चांगले कार्य करणाऱ्याचे अभिनंदन करीत अशाच प्रकारे ग्राहकसेवा आणि वीजदेयक थकबाकी वसुली दरमहा करण्याचे आवाहन कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी केले. प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र, एकलहरे येथे महावितरणच्या नाशिक, मालेगाव व धुळे मंडळातील सर्व अभियत्यांची व अधिकाऱ्यांची आढावा बैठक आज दि. २२ जुलै रोजी घेतली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महावितरणच्या नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर, अधिक्षक अभियंते ज्ञानदेव पडळकर, रमेश सानप व पंकज तगडपल्लीवार उपस्थित होते.

संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून नाशिक, मालेगाव व धुळे मंडळातील विविध विषयाचा आढावा घेऊन सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे पुढे बोलतांना म्हणाले की, ग्राहकांना दरमहा त्यांनी वापरलेल्या विजेचे देयक मीटर रीडिंग च्या माध्यमातून वाचन करून अचूक, योग्य व वेळेत देण्यासाठी मीटर रीडिंग एजन्सीं नेमण्यात आलेल्या आहेत. या एजन्सींना मीटर वाचन करताना फोटोंचा दर्जा सुधारण्यास आणखी अचूक काम करण्यास सांगितले आहे, जेणेकरून ग्राहकांच्या वापरानुसार अचूक तथा वेळेत देयक वितरित करता येईल. बिलिंगच्या चांगल्या कार्यक्षमतेसाठी मीटर रीडिंग एजन्सीं यांचेसह उपविभागीय अभियंते व कार्यकारी अभियंते यांनी सुद्धा प्राथमिकतेने लक्ष द्यावे. घरगुती, औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांसह पथदिवे, पाणीपुरवठा योजना व इतर सेवा यांची सुद्धा देयके वेळेत भरण्यासाठी अभियंत्यांनी पाठपुरावाकरावा. वीज देयक न भरल्याने खंडित वीज पुरवठा असलेल्या ग्राहकांची वीज जोडणीची तपासणी करण्याचे निर्देशही सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिले. यावेळी नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी परिमंडळात सर्वानी आणखी गतिमानतेने व उत्कृष्ठ कार्य करण्याचे आवाहन केले. बैठकीला नाशिक, मालेगाव व धुळे मंडळातील सर्व कार्यकारी अभियंते, अभियंते, अधिकारी उपस्थित होते.

पावसात व पुरात सुरळीत वीजपुरवठा करणाऱ्या जनमित्रांचा केला गौरव

नाशिक ग्रामीण विभागातील ईगतपुरी येथे या महिन्यात आलेल्या पाऊसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा वेगवेगळ्या घटनांमध्ये पुराच्या पाण्यात जाऊन सुरळीत करणाऱ्या अमोल जागले आणि प्रवीण शिंगवे या दोन जनमित्रांचा कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल देऊन बैठकीदरम्यान गौरव करण्यात आला. प्रवीण शिंगवे यांनी दारणा नदीच्या पाण्यात पडलेली विद्यूत तार पाण्यातून घेऊन जात विद्युत पुरवठा सुरळीत केला होता. तर अमोल जागले याने रायंबे येथील खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मुकणे धरणातील पुराच्या पाण्यात पोहत जाऊन खांबावर चढून वीजपुरवठा पूर्ववत केला होता. या संदर्भातील त्यांच्या कार्याचे व्हिडिओ समाज माध्यमावर सुद्धा व्हायरल झाले होते. त्यांची तत्पर ग्राहकसेवा आणि धडाडीच्या कार्याचा गौरव सदर बैठकीदरम्यान करण्यात आला.
फोटोओळ – जनमित्रांचा गौरव करताना सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे, मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंते ज्ञानदेव पडळकर, रमेश सानप व पंकज तगडपल्लीवार व इतर.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.